शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

शंभराव्या नाट्यसंमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल, मोहन जोशी यांची नावे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 14:05 IST

या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार? हा औत्सुक्याचा विषय...

ठळक मुद्देपरिषदेच्या घटनेनुसार निवड ही बिनविरोध पद्धतीनेजोशी यांच्या तुलनेत डॉ. जब्बार पटेल यांचे पारडे जड राहण्याची शक्यता अधिक

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता नाट्यक्षेत्राला १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष कोण होणार? याचे वेध लागले आहेत. नाट्य परिषदेच्या विविध शाखांसह वैयक्तिक स्तरावर संमेलनाध्यक्ष पदासाठी सोमवारपर्यंत (दि. ३०) अर्ज मागविले होते. शाखांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीमधून ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ अभिनेते व नाट्य परिषद मुंबईचे माजी अध्यक्ष मोहन जोशी अशी दोन नावे वैध ठरली आहेत. या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार? हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. परिषदेच्या घटनेनुसार निवड ही बिनविरोध पद्धतीने केली जाते. त्यासाठी विविध शाखांकडून अर्ज मागविले जातात. त्यानुसार सोमवारी प्राप्त झालेल्या अर्जांमधून डॉ. जब्बार पटेल व मोहन जोशी यांचे अर्ज वैध ठरले. पुणे व कोथरूड शाखेकडून मोहन जोशी तर मुंबईकडून डॉ. जब्बार पटेल यांचे नाव सुचविल्याचे कळते. मोहन जोशी यांनी नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्षपद भूषविले आहे. दोन्हीही नाट्यक्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्वे असली तरी जोशी यांच्या तुलनेत डॉ. जब्बार पटेल यांचे पारडे जड राहण्याची शक्यता अधिक आहे. कारण मध्यवर्ती शाखेकडून डॉ. पटेल यांच्याच नावाला अधिक पसंती आहे. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही दोन ठेवली जातील व त्यातील एका नावाची एकमताने निवड करण्यात येईल...............शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल व मोहन जोशी यांची नावे वैध ठरली आहेत. नियामक मंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत ही दोन नावे ठेवली जातील. मात्र बैठक कधी घेण्यात येईल हे अद्याप ठरलेले नाही.- प्रसाद कांबळी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई

टॅग्स :PuneपुणेMohan Joshiमोहन जोशीJabbar Patelजब्बार पटेल