शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

पवारांची पॉवर : मनोहर जोशींप्रमाणे मुख्यमंत्रीपदी ऐनवेळी लागणार संजय राऊतांची वर्णी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 1:52 PM

प्रशासकीय अनुभव कमी असल्याने उद्धव मुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे, अनिल देसाई आणि संजय राऊत यांचे नाव आघाडीवर आहे.

मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या अवतीभवती फिरत आहे. मागील काही दिवसांत पवारांची राज्याच्या राजकारणावरची पकड सैल झाल्याची चर्चा सुरू होती. सत्ताधारी भाजपच्या चालींनी  तशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर पवारांनी आपला करिष्मा दाखवत आपल्यासह काँग्रेसला सत्तेत परत आणल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. आता पवारांचा तोच करिष्मा खासदार संजय राऊतांना मुख्यमंत्री बनवतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकमेकांचा चांगले मित्र. अनेक मुद्दांवर पवार आणि ठाकरे यांच्यात विरोध झाला. मात्र अनेकदा एकमतही झालं. आता पुन्हा या दोघांची मैत्री राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे. 1995 मध्ये जेव्हा पहिल्यांदा राज्यात युतीचं सरकार आलं होतं त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री ठरवताना पवारांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. 

बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सुधीर जोशी यांचे नाव अंतिम केले होते. हेच अंतिम केलेले नाव सांगण्यासाठी त्यांनी पवारांना फोन लावला होता. त्यावेळी पवारांनी अडणाव जोशीच राहुद्या पण पहिलं नाव बदला असा सल्ला दिला होता. त्यानंतर बाळासाहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मनोहर जोशी यांच्यावर सोपवली होती. या संदर्भातील दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे 'आधारवड' या पुस्तकात करण्यात आलेला आहे.

आताही असच काही घडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र प्रशासकीय अनुभव कमी असल्याने उद्धव मुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि संजय राऊत यांचे नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांच्यासाठी शरद पवारही सकारात्मक आहेत. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्रीपदी राऊतांची वर्णी लागते की काय, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.