शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यात पोलिस अपुरे

By admin | Updated: May 19, 2016 04:00 IST

या तालुक्यात मोठया प्रमाणात लोकसंख्या वाढत असून ती ३ लाखाहून अधिक आहे.

सुनील घरत,

वसई/पारोळ- या तालुक्यात मोठया प्रमाणात लोकसंख्या वाढत असून ती ३ लाखाहून अधिक आहे. या तालुक्यात १ हजार ९८७ लोकांच्या सुरक्षेसाठी १ पोलिस अशी दयनीय अवस्था आहे वसईत परप्रांतियांचे वाहते लोंढे, कोणत्याही ओळखीपाळखीशिवाय राहत असलेले गुन्हेगारीवृत्तीचे लोक, नालासोपारा पूर्वेकडील संतोषभुवन, धानिवबाग, पेल्हार, वाकणपाडा, नवजीवन, वसईफाटा हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जात असून या भागात सहजपणे कायदा हातात घेतला जात आहे. वाढती गुन्हेगारी, अल्पवयीन मुलींचे अपहरण, व्यापाऱ्याच्या हत्या, चैन स्रॅचिंग, चोरी, दरोडे, या सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने वसई तालुक्यातील पोलिस यंत्रणा अधिक बळकट करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते/नगरसेवक धनंजय गावडे यांनी राज्योच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.वसई तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नालासोपारा, तुळींज, वालीव, माणिकपूर, विरार या पोलिस ठाण्यातील बल वाढवण्यात यावे, रिक्त पदे तातडीने भरणे, अधिकाऱ्याच्या व कर्मचाऱ्याच्या निवासाचीसोय करणे, पोलिस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे, पोलिसांना आवश्यकतेनुसार अत्याधुनिकशस्त्रे, साधनसामुग्री, व वाहन पुरवणे, गुप्तचर यंत्रणा अधिक बळकट करणे हया मागण्यांचे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिल्याचे धनंजय गावडे यांनी लोकमतला सांगितले. वसई-विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे, हा प्रस्ताव अनेक वर्षे पडून आहे. तसेच नव्याने वाढलेल्या परिसरासाठी सुचविलेली नवीन पोलीस ठाणीही लालफितीत आहे. या दोन गोष्टी झाल्या तरच पोलीस बळ वाढेल. अन्यथा, स्थिती जैसे थे राहिल.वसई तालुक्यात वसई, वालीव, विरार, माणिकपूर , अर्नाळा, नालासोपारा, बोळींज या पोलिस ठाण्यांचा समावेश असून या पोलिस ठाण्यामध्ये पोलिस बलही अपुरे आहे. तसेच दोन पोलिस ठाणी मान्यतेच्या प्रतिक्षेत आहेत. वसईतील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसबल व साधनसामुग्री अपुरी पडत असल्याने वसईत गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलिसांपुढे आव्हान उभे राहत आहे.