शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ‘नैतिक ठेकेदारी’ची चौकशी

By admin | Updated: August 11, 2015 02:19 IST

पश्चिम उपनगरातील मढ, अक्सा आणि दानापानी किनारपट्टीवरील प्रेमीयुगुल आणि परिसरातील लॉजेस्वर केलेली कारवाई मालवणी पोलिसांना चांगलीच महागात पडण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : पश्चिम उपनगरातील मढ, अक्सा आणि दानापानी किनारपट्टीवरील प्रेमीयुगुल आणि परिसरातील लॉजेस्वर केलेली कारवाई मालवणी पोलिसांना चांगलीच महागात पडण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडियावरून पोलिसांच्या कारवाईबाबत टीका होऊ लागल्याने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकरणी अपर आयुक्त पाटील यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. मालवणी पोलिसांनी ६ आॅगस्टला अक्सा, मढ आणि दानापानी किनारपट्टीवर काही तळीराम आणि अश्लील चाळे करीत असल्याच्या कारणावरून ६४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. यामध्ये १३ जोडप्यांचाही समावेश होता. त्यांच्याकडून प्रत्येकी १२०० रुपये दंड वसूल केला. ‘मॉरल पोलिसिंग’च्या नावाखाली पोलिसांनी मर्यादा ओलांडली असल्याचा आरोप यातील काही जोडप्यांनी केला. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त फत्तेसिंग पाटील यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी सुरू केली आहे. यासंबंधी पोलिसांकडे आलेल्या तक्रारी आणि कारवाईच्या कागदपत्रांची तपासणी केली जात असून, संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावरून टीकाखासगीमध्ये स्त्री-पुरुष संमतीने भेटत असतील तर त्यात वावगे ते काय? त्यामुळे सार्वजनिक नीतिमत्तेला धोका कसा पोहोचतो? या प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या काही जोडप्यांनी आपला आवाज बुलंद केला आहे. या मागणीला तरुणवर्गाकडून पाठिंबा मिळत असून, टिष्ट्वटर आणि सोशल मीडियावरून त्याबाबत रोष व्यक्त केला जात आहे. ‘बंद खोलीत आम्ही एकमेकांच्या संमतीने काय करतो याच्याशी पोलिसांना देणे-घेणे नाही,’ असे सांगत पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप काही जोडप्यांनी केला आहे. (प्रतिनिधी) लॉजमालक काय म्हणतात... एक तरुणी तिच्या भावी जोडीदारासोबत आली होती. त्यांना पकडल्यामुळे संबंधित तरुणीने महिला पोलिसाला थप्पड मारली. त्यानंतर महिला हवालदाराने तरुणीला मारहाण केली. पोलिसांनी लॉजवर छापा टाकून दरवाजाला कुलूप लावले. त्यानंतर प्रत्येक खोलीची तपासणी केली. आमच्याकडे १७ गेस्ट होते. त्या सर्वांना पोलिसांनी जबरदस्ती पोलीस स्टेशनमध्ये नेऊन १२०० रुपयांचा दंड ठोठावत होते, अशी माहिती कारवाई झालेल्या एका लॉज मालकाने दिली. पोलिसांनी केले समर्थन... : कारवाई झालेली जोडपी आणि सोशल मीडियावरून कारवाईवर टीका होत असली तरी पोलिसांनी मात्र कारवाईचे समर्थन केले आहे. स्थानिक रहिवाशांनी सार्वजनिक शिष्टाचाराला अडथळा आणल्याची तक्रार केल्यानंतर कारवाई केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. काही तरुण दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची तक्रार रहिवाशांनी केल्यामुळे लॉजेस्ची तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.