शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडूनच अश्लील शेरेबाजी

By admin | Updated: December 15, 2014 04:08 IST

अत्यंत हीन व खालच्या स्तरावर केलेल्या या शेरेबाजीच्या संभाषणाची आॅडिओ रेकॉर्डिंग क्लीप व्हॉटस् अपवरुन व्हायरल झाल्याने संबंधित महिला पूर्णपणे हादरुन गेली

जमीर काझी, मुंबईपोलीस खात्यातील बेशिस्त खपवून न घेण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असताना एका पोलीस महिला अधिकाऱ्याबद्दल काही अधिकाऱ्यांनीच केलेले अश्लील वक्तव्य मुंबई पोलीस वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. वरिष्ठ निरीक्षक दर्जाच्या पदावर कार्यरत असलेल्या या महिलेबाबत अत्यंत हीन व खालच्या स्तरावर केलेल्या या शेरेबाजीच्या संभाषणाची आॅडिओ रेकॉर्डिंग क्लीप व्हॉटस् अपवरुन व्हायरल झाल्याने संबंधित महिला पूर्णपणे हादरुन गेली आहे. आपली प्रतिमा मलीन केल्याने आत्महत्या करण्याचा इशारा या महिल्या अधिकाऱ्याने दिला आहे. बदनामी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या महिलेने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे केली आहे. संबंधित महिला अधिकारी व त्यांच्याबद्दल वक्तव्य करणारे दोघेही निरीक्षक दर्जाचे आहेत. महिला ही त्यांच्या पेक्षा ‘सीनियर’असून काही महिन्यांपूर्वी दोघे एकाच ठिकाणी नेमणुकीला होते. मात्र तेव्हापासून त्यांच्यात विस्तव जात नव्हता. सहा महिन्यांपूर्वी महिला अधिकाऱ्याची त्या शाखेतून अन्यत्र तर त्याची अन्य चौकीमध्ये बदली झाली असून प्रभारी म्हणून काम करीत आहे. तेथेच नेमणुकीला असलेला एक सहाय्यक निरीक्षक हा साहेबांचे त्या महिला अधिकाऱ्याबद्दल काय मत आहे, ते तिचा उल्लेख कसा करतात, याबाबत अन्य एका तिऱ्हाईत व्यक्तीला माहिती देताना अ‍ॅडिओ रेकॉर्डिंग केले आहे. संबंधित वरिष्ठ महिला निरीक्षकेला त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर थेट आयुक्ताकडे धाव घेतली. यापूर्वी एका शाखेत काम करीत असतानाही हा अधिकारी आपल्याबद्दल अश्लील वक्तव्य करीत होता, आता बदली झाल्याने त्याच्याशी आपला काहीही संबंध येत नाही. तरीही माझ्याबद्दल जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे आपली प्रतिमा मलीन झाली असून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे या महिलेने आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.