शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 16:09 IST

"काँग्रेसचा फॉर्म्युला फोडा आणि राज्य करा, असा आहे. त्यांच्या कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांनाही भडकावले."

हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतर आता भाजपचे लक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) डिजिटल माध्यमाने महाराष्ट्रात 7600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने 10 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "काँग्रेसचा फॉर्म्युला फोडा आणि राज्य करा, असा आहे. त्यांच्या कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांनाही भडकावले."

काँग्रेसने समाजात फूट पाडल्याचा आरोप - पीएम मोदी म्हणाले, "काँग्रेस पूर्णपणे संप्रदाय आणि जातीच्या आधारावर निवडणूक लढते. हिंदू समाजात फूट पाडणे आणि त्याला विजयाचा फॉर्म्युला बनवणे, हाच काँग्रेसच्या राजकारणाचा आधार आहे. काँग्रेस 'सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय' या भारताची परंपरेचे दडपत आहे. हे सनातन परंपरेला दडपत आहेत."

मोदी पुढे म्हणाले, "हिंदूंमधील एका जातीचे दुसऱ्या जातीशी भांडण लावणे, हेच काँग्रेसचे धोरण आहे. हिंदूंमध्ये जेवढी फूट पडेल, त्यांना तेवढाच फायदा होईल, हे काँग्रेसला माहीत आहे. काँग्रेसला कुठल्याही प्रकारे हिंदू समाज पेटवत ठेवायचा आहे. म्हणजे त्यांना त्यावर राकीय पोळ्या भाजता येतील. भारतात कुठेही निवडणुका असोत, तेथे काँग्रेस हाच फॉर्म्युला वापरते."

"महाराष्ट्रातील जनतेने भाजपला मतदान करावे" -महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत मोदी म्हणाले, "मला पूर्ण विश्वास आहे की, जे लोक आज समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. असा प्रत्येक प्रयत्न महाराष्ट्रातील जनता हाणून पाडेल. महाराष्ट्रातील जनतेने देशातील विकास सर्वोपरी ठेवून  संघटित होऊन महायुतीला मतदान करायला हवे."

यावेळी पंतप्रदान मोदी यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला ते म्हणाले, "काँग्रेसने तरुणांना टार्गेटकेले आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भडकवण्याचा प्रयत्नकेला. मात्र, हरियाणातील तरुण, आपल्या बहिणी आणि मुली त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपवर विश्वास ठेवत आहेत." 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४