शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 06:40 IST

५५ कोटींचा खर्च अपेक्षित, राज्यातील सर्वाधिक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महेश कोले मुंबई : राज्यभरातील महामार्गांवर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे, मार्गदर्शक फलक नसल्यामुळे भीषण अपघात घडतात. चुकीच्या ठिकाणी फलक लावण्यात आलेल्या असंख्य तक्रारीही आहेत. या पार्श्वभूमीवर आता ३० हजार किमी महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आयआयटी रुरकी या प्रतिष्ठित संस्थेची नेमणूक करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने शासनाला पाठवला असून संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च ५५ कोटी असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

अनेक महामार्गांवर वेगमर्यादा दर्शविणारी चिन्हे, वळणांची पूर्वसूचना, धोकादायक ठिकाणांचे संकेत, तसेच मार्गदर्शक फलक अपुरे किंवा चुकीच्या ठिकाणी असल्याच्या तक्रारी आहेत.  तज्ज्ञांच्या मते, मानकांनुसार बसवलेली वाहतूक चिन्हे अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना ठरेल.

बांधकाम विभागाचा अभिप्राय घेणारराज्यातील सर्वाधिक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित विभागांकडून तांत्रिक व आर्थिक बाबींचा आढावा घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला, तर महामार्गांवरील वाहतूक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

अचूक वाहतूक व्यवस्थापन होऊन अपघात घटणारपरिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, “रोड सायनेज ऑडिटमुळे वाहतूक व्यवस्थापन अचूक होईल तसेच अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घटू शकते. वाहतूक चिन्हे दीर्घकालीन शाबूत राहावे, यासाठी त्याचे ऑडिट आणि गुणवत्ता सुधारणे आवश्यक असल्याने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

काय असेल स्वरूप?विद्यमान वाहतूक चिन्हे अचूक ठिकाणी दर्शविण्यात येतील.वेगमर्यादा फलकांची गरज आणि स्थानअपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) भाग शोधून कार्यवाही करता येईल.रात्रीच्या वेळी दृश्यमानतेसाठी रिफ्लेक्टिव्ह सायनेजची सुविधाआंतरराष्ट्रीय मानकांनुसार वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा 

English
हिंदी सारांश
Web Title : Road sign audit on highways proposed; IIT Roorkee likely appointed.

Web Summary : Maharashtra plans a road sign audit across 30,000 km of highways due to frequent accidents. IIT Roorkee's appointment is proposed for the ₹55 crore project. The audit aims to improve signage accuracy, visibility, and reduce accidents by adhering to international standards.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्ग