शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 07:25 IST

९ जानेवारी रोजी झालेल्या तीव्र भांडणानंतर महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयावरून जोसेफ आणि मारिया तसेच मुलगा काल्टन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले

मुंबई - सतत होणाऱ्या वादातून ८० वर्षीय बहिणीची हत्या करून मृतदेह ड्रेनेज लाइनमध्ये फेकणाऱ्या भावाला व त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी झालेले हे हत्याकांड ड्रेनज लाइनच्या सफाई कामादरम्यान उघडकीस आल्याचे अंधेरी पोलिसांनी सांगितले. 

२४ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बृहन्मुंबई पालिकेचे कर्मचारी ड्रेनेज साफसफाईचे काम करताना ओमनगर, मरोळ पाइपलाईन, अंधेरी पूर्व येथील मॅनहोलमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच अंधेरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह कुजल्यामुळे महिलेची ओळख पटविणे आवाहन होते. या प्रकरणाचा तपासासाठी पोलिसांचे पथके नेमण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेतली. मृतदेहावरील दागिन्यांच्या आधारे महिलेचे नाव ब्लान्स जेम्स सिक्वेरा असल्याचे समजले. 

पाेलिसांत खाेटी तक्रार१० जानेवारीपासून बेपत्ता असल्याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात नोंद होती. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता मृत महिलेचे तिचा भाऊ जोसेफ कोयलो आणि त्याची पत्नी मारिया कोयलो यांच्याशी वारंवार वाद होत असल्याचे समोर आले.

अंधेरी पाेलिसांनी भावासह पत्नीला ठोकल्या बेड्या९ जानेवारी रोजी झालेल्या तीव्र भांडणानंतर महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयावरून जोसेफ आणि मारिया तसेच मुलगा काल्टन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सखोल चौकशीत जोसेफ याने १० जानेवारीच्या मध्यरात्री बहिणीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मॅनहोलमध्ये टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने पत्नीच्या मदतीने सहार पोलिस ठाण्यात बहीण बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी जोसेफ आणि मारिया यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Drainage Cleaning Uncovers Murder: Brother Arrested for Sister's Killing

Web Summary : Mumbai: A man and his wife were arrested for killing his sister three months ago and disposing of her body in a drainage line. The murder was revealed during routine drainage cleaning in Andheri. The brother confessed to the crime after initially filing a false missing person report.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी