शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 06:55 IST

सरनाईक हे समर्थकांकडून भूमिपुत्रांना धमकावत असल्याचा गंभीर आरोप मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. 

ठाणे - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला. भाईंदरपाडा भागातील भूमिपुत्रांची १२ गुंठे जमीन सरनाईक आणि त्यांच्या विहंग बिल्डर्सचे काम करणाऱ्या इतरांनी बळकावल्याचा आराेप मेहता यांनी केला आहे. त्यासाठी त्यांना सह-आराेपी करून कारवाईची मागणीही पाेलिस उपायुक्त प्रशांत कदम आणि ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

भाईंदरपाड्यात खासगी सुरक्षा रक्षक आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी दाेन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केल्याची माहिती कासारवडवली पाेलिसांनी साेमवारी दिली.

भूमिपुत्रांवरील अन्यायाचा दावा 

संबंधित भूमिपुत्रांवर अन्याय झाल्याचा दावा करत आ. मेहता यांनी मीरा-भाईंदरच्या कार्यकर्त्यांसह साेमवारी कासारवडवली पोलिस ठाणे गाठले. यावेळी त्यांनी मंत्री सरनाईक यांच्यावर कारवाईची मागणी केली. सरनाईक हे समर्थकांकडून भूमिपुत्रांना धमकावत असल्याचा गंभीर आरोप मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. 

‘विहंग’चे जगताप यांच्या तक्रारीत काय? विहंग ग्रुप कन्स्ट्रक्शन कंपनीचे आर्किटेक्ट अभिजीत जगताप (३२) यांच्या तक्रारीनुसार, २६ एप्रिल राेजी ते भाईंदरपाड्यातील जागेवर पाेकलेनच्या मदतीने साफसफाईचे काम करत हाेते. त्यावेळी केशव भाेईर हा सुरा घेऊन आला. त्याच्यासाेबत जगन्नाथ भाेईर तसेच इतर आठ ते दहा जण काठ्या आणि दगड घेऊन पाेकलेनवरील चालक अजय सिंग (वय ३५) याला सुऱ्याचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. इतरांनी त्याला मारहाण करून दुखापत केली. हा आमचा प्लाॅट आहे सांगून कामगारांना मारहाण केली. असा आरोप विहंग ग्रुपच्या अभिजीत जगताप यांनी केला आहे.

जगन्नाथ भाेईर यांच्या तक्रारीत काय?भाईंदरपाडा येथील रहिवासी जगन्नाथ भाेईर (४५) यांच्या तक्रारीनुसार २६ एप्रिलला मध्यरात्री एकच्या सुमारास विहंग बिल्डर्स एलएलपी आणि विहंग मरीना प्राेजेक्टच्या वतीने राेहित मालुसरे आणि त्यांच्यासाेबत असलेल्या ८० ते १०० जणांच्या जमावाने त्यांच्या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मालुसरे यांच्यासह ७० ते ८० जणांविरुद्ध त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीच्या मालकीबाबत कायदेशीर पडताळणी केली जात आहे. निष्पक्षपणे चाैकशी केली जाणार आहे. दाेन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. - प्रशांत कदम, पाेलिस उपायुक्त, वागळे इस्टेट

English
हिंदी सारांश
Web Title : Bhayanderpada: Clash over land, security guards vs villagers, allegations against Sarnaik.

Web Summary : Clash erupted in Bhayanderpada over a 12 Guntha land dispute, involving villagers and security guards. Allegations point to Pratap Sarnaik's involvement in land grabbing, fueling tensions between political figures Narendra Mehta and Sarnaik. Both parties have filed complaints, police investigation underway.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकBJPभाजपा