शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

जनताच मुश्रीफांना राजकारणातून हद्दपार करेल

By admin | Updated: October 20, 2015 00:51 IST

‘ताराराणी’चा पलटवार : तुम्ही जिल्हा बँक बुडवली त्याचे काय..?

कोल्हापूर : ‘महाडिक शहाणे की, कोल्हापूरकर मूर्ख’ असा प्रश्न आमदार हसन मुश्रीफ यांनी उपस्थित करून जनतेचा आणि लोकशाहीचा अवमान केला आहे. कोल्हापूरची जनता मुश्रीफांच्या दावणीला बांधलेली नाही, याचे भान ठेवावे; अन्यथा जनता तुम्हाला राजकीय जीवनातून हद्दपार करेल, असा प्रतिटोला ताराराणी आघाडीचे प्रवक्ते माजी महापौर सुनील कदम यांनी सोमवारी प्रसिद्धीपत्रकातून लगावला. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीला बहुमत देऊन जनता शहाणी आहे, याचा प्रत्यय मुश्रीफांना येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना दसरा चौकात झालेल्या सभेत आमदार मुश्रीफ यांनी एकाच घरात तीन वेगवेगळ््या पक्षांतून निवडून आलेल्या महाडिक यांच्यावर ‘महाडिक शहाणे की कोल्हापूरकर मूर्ख’ अशी उपरोधिक टीका केली होती. मुश्रीफांनी केलेली ही टीका ‘ताराराणी’ला चांगलीच झोंबली. त्यामुळे तिचा खरपूस समाचार घेताना कदम यांनी पत्रकात म्हटले आहे की, ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवली, उद्योजकांना हैराण केले, त्यांनी महापालिकेत काय दिवे लावले हे सर्वांना माहीत आहे. दहा वर्षांत महापालिकेतील भोंगळ कारभारामुळेच कोल्हापूरचा स्मार्ट सिटीत समावेश होऊ शकला नाही. त्यांनी जनतेला भूलवण्याचे काम बंद करावे. महाडिक कुटुंबातील तिघांना जनतेने विश्वासाने निवडून दिले आहे. जनता दूधखुळी नसते तर सुज्ञ असते, याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवावे. भाजप-ताराराणी महायुतीकडे विकासाची दृष्टी आहे. येत्या निवडणुकीत महायुतीला कौल देऊन जनता आपले शहाणपण सिद्ध करेल. पक्षीय पातळीवर निवडणूक होत आहे. असे असताना माजी मंत्र्यांना केवळ भाजप-ताराराणी आघाडीवर बोलावेसे वाटत आहे. याचा अर्थ त्यांनी आघाडीचा धसका घेतल्याचे स्पष्ट होते. ते वैफल्यातून अशी विधाने करत आहेत. नियोजनबद्ध विकास आराखडा घेऊन आघाडी निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे जनता पाच वर्षांसाठी महापालिकेची एकहाती सत्ता भाजप-ताराराणी महायुतीकडे देईल, यात शंका नाही.जनतेने खासदार केले...कोणतीही सत्ता नसताना केलेले काम डोळ्यांसमोर ठेवून जनतेने धनंजय महाडिक यांना खासदार केले. खासदार महाडिक हे जनतेचा विश्वास सार्थ ठरवत, प्रामाणिकपणे काम करत आहेत. आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक यांनी जनतेशी प्रतारणा केली नाही, म्हणून त्यांना विजय संपादन करता आला, असेही सुनील कदम यांनी पत्रकात म्हटले आहे.