परतवाडा व्हिडीओ कांड : नागपूरहून आलेल्या 'त्या' पीडितेने तोडले मौन, बयाणासाठी अमरावतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 13:13 IST2026-04-19T13:11:03+5:302026-04-19T13:13:56+5:30

Amravati : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या आणि देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या परतवाडा येथील 'व्हिडिओ कांड' प्रकरणाच्या तपासात शनिवारी खळबळजनक प्रगती झाली आहे.

Parthwada video scandal: 'That' victim from Nagpur breaks silence, goes to Amravati to give statement | परतवाडा व्हिडीओ कांड : नागपूरहून आलेल्या 'त्या' पीडितेने तोडले मौन, बयाणासाठी अमरावतीत

Parthwada video scandal: 'That' victim from Nagpur breaks silence, goes to Amravati to give statement

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या आणि देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या परतवाडा येथील 'व्हिडिओ कांड' प्रकरणाच्या तपासात शनिवारी खळबळजनक प्रगती झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून ग्रामीण पोलिसांच्या एसआयटीला ज्या आठ पीडितांची प्रतीक्षा लागून राहिली होती. त्यातील एक १५ वर्षीय अल्पवयीन पीडिता अखेर समोर आली असून, शनिवारी १८ एप्रिल रोजी तिचे अधिकृत बयाण नोंदवण्यात आले. यामुळे आता मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्या गळ्याभोवतीचा फास अधिक घट्ट झाला आहे. तिला एसआयटीच्या महिला अधिकाऱ्यांनी शनिवारी अमरावती जिल्ह्यात आणले.

या प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर, दोन मुलींवर लैंगिक अत्याचारही उघड झाला होता. पीडित मुलींनी समोर येण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले होते. मात्र, भीती व बदनामीपोटी कोणीही पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने रात्रंदिवस एक करून नागपूर येथून या १५ वर्षीय मुलीचा शोध लावला.

ही मुलगी मूळची नागपूरची की कसे, ते स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र ती नागपुरातून बयाणासाठी आल्याचे पोलिस अधीक्षकांसह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील सांगितले.

काय आहे नेमकं प्रकरण?

नराधम अयान अहमद (१९, परतवाडा) याने अनेक मुलींशी शारीरिक जवळीक साधून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो काढले होते. पैशांच्या वादातून त्याचा मित्र उजेर खान याने हे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
११ एप्रिल रोजी हे व्हिडिओ वाऱ्यासारखे पसरले आणि एकच खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी १३ एप्रिल रोजी रात्री सुमोटो कारवाई करत अयान अहमदविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला त्याच रात्री अटक केली होती. याप्रकरणी त्याच्यासह आठजण अटकेत आहेत.

आता अयान अहमदचे 'काऊंटडाऊन' सुरू !

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण आठ पीडित मुलींची ओळख पटली होती, त्यापैकी दोन मुलींवर शारीरिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते.
  • आता या १५ वर्षीय मुलीच्या बयानामुळे या प्रकरणात पोक्सो कलमांतर्गत अधिक कारवाई होण्याची शक्यता आहे. तिच्या बयानात नेमके काय पुढे येते, त्यावर मूळ गुन्ह्यात कलमे वाढवायची की स्वतंत्र गुन्हा दाखल करायचा, याचा निर्णय घेतला जाईल.
  • फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आलेल्या पाच मोबाईलपैकी तीन मोबाईलचा डेटा पोलिसांना प्राप्त झाला असून, आता या डेटाच्या सखोल विश्लेषणातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

 

"याप्रकरणी शनिवारी १५ वर्षीय पीडिता समोर आली आहे. महिला पोलिस अधिकारी काही दिवसांपासून तिच्याशी संवाद साथत होत्या. समुपदेशनानंतर महिला पोलिस अधिकारी आणि सीडब्ल्यूसीच्या उपस्थितीत तिचे बयान नोंदवले जात आहे."
- विशाल आनंद, पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण)

Web Title : परतवाड़ा वीडियो कांड: नागपुर की पीड़िता ने तोड़ी चुप्पी, अमरावती में बयान

Web Summary : परतवाड़ा वीडियो कांड में 15 वर्षीय पीड़िता अमरावती में सामने आई। उसके बयान से मुख्य आरोपी अयान अहमद के खिलाफ मामला मजबूत हुआ, जिस पर कई लड़कियों के आपत्तिजनक वीडियो रिकॉर्ड करने और साझा करने का आरोप है। पुलिस जब्त किए गए फोन से डेटा का विश्लेषण कर रही है।

Web Title : Paratwada Video Scandal: Nagpur Victim Breaks Silence, Statement in Amravati

Web Summary : A 15-year-old victim in the Paratwada video scandal has come forward in Amravati. Her statement strengthens the case against the main accused, Ayan Ahmad, who is accused of recording and sharing objectionable videos of multiple girls. Police are analyzing data from seized phones.