शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 05:59 IST

Palghar Zilla Parishad School: शिक्षकाच्या दहशतीमुळे विद्यार्थी शाळेऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक बाब समोर आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार (पालघर): शिक्षकाच्या दहशतीमुळे विद्यार्थी शाळेऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जव्हार तालुक्यातील जांभूळमाथा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली असून, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जांभूळमाथा येथील शिक्षक लोकनाथ जाधव यांनी शुक्रवारी विवेक बिपिन भोरे, साईनाथ मोरघा, स्वप्निल मोरघा, चेतन अनेक, प्रमोद जंगली या विद्यार्थ्यांना १ किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी भरायला पाठवले. दूर अंतर असल्याने विद्यार्थ्यांना पाणी आणण्यास उशीर झाला. यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. हे चित्र पाहताच, उर्वरित विद्यार्थी जंगलात लपून बसले. ही बाब पंचायत समितीच्या प्रशासकीय विभागाला कळूनही अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही, असा आरोप पालकांकडून होत आहे.  

लोकनाथ जाधव या शिक्षकावर तत्काळ कारवाई नाही केली, तर आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करू.सुभाष भोरे, उपसरपंच, ढाढरी ग्रामपंचायत. जांभूळमाथा शाळेतील शिक्षकाच्या वर्तणुकीबाबत समजले आहे. संबंधित विभागाला शहानिशा करून उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर.

दर शनिवारी दांडी, शिकविण्याकडे दुर्लक्ष

शाळेत पहिली ते आठवीपर्यंत तुकड्या असून, येथील पटसंख्या ९६ आहे. शाळेची नियमित वेळ १०:३० आहे. परंतु शिक्षक लोकनाथ जाधव हे ११:३० वाजता हजेरी लावतात. मुलांना अंगणात उभे करणे, मुलांच्या शिकविण्याकडे दुर्लक्ष करून मोबाइलमध्ये रमणे, वारंवार उशिरा शाळेत येणे, शनिवारी गैरहजर राहणे या सर्व प्रकारांनी पालक संतापले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Palghar: Children hid in forest fearing teacher's beating; what happened next?

Web Summary : In Palghar, students hid in the forest due to a teacher's violence. Parents demand action after a teacher allegedly beat students for being late fetching water, prompting others to flee. Officials are investigating the incident.
टॅग्स :palgharपालघरSchoolशाळाMaharashtraमहाराष्ट्र