पालघर गुजरातचं की महाराष्ट्राचं?; चक्क गुजराती भाषेत निघाली अधिसूचना, स्थानिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 19:38 IST2026-01-20T19:37:03+5:302026-01-20T19:38:47+5:30

हिंदीत पत्रक असतानाही गुजराती भाषेत काढलेले वेगळे पत्रक अनेकांना पचनी पडलेले नाही.

Palghar belongs to Gujarat or Maharashtra?; Traffic control notification issued in Gujarati language, locals angry | पालघर गुजरातचं की महाराष्ट्राचं?; चक्क गुजराती भाषेत निघाली अधिसूचना, स्थानिकांचा संताप

पालघर गुजरातचं की महाराष्ट्राचं?; चक्क गुजराती भाषेत निघाली अधिसूचना, स्थानिकांचा संताप

अनिरुद्ध पाटील

बोर्डी - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय मार्ग (४८) हा १९ आणि २० जानेवारी रोजी मुंबईकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी बंद केला आहे. याबाबत पालघर जिल्हा प्रशासनाने वाहतूक नियंत्रण अधिसूचनेचे काढलेले गुजराती भाषेतील पत्रक सोशल मीडियावर फिरत असल्याने पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या गुजराती प्रेमावर टीका होत आहे.

अनेकांकडून संताप व्यक्त

या अधिसूचनेनुसार हा राष्ट्रीय महामार्ग जड अवजड वाहनांसाठी १९ जानेवारी रोजी सकाळी ८ ते रात्री १० तसेच २० जानेवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी २ या कालावधीत बंद राहणार आहे. हे पत्रक मराठी, हिंदी तसेच गुजराती भाषेत असून काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर हे पत्रक पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय मार्गावरून उत्तर भारताच्या अनेक राज्यातील वाहने मुंबईकडे जातात. मात्र हिंदीतही पत्रक होते.

पत्रकामुळे वादाला तोंड

काही वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते पनवेल मेमू गाडीच्या डब्यातील इंडिकेटरवर गुजराती भाषेतील सूचना वादाचा विषय ठरली होती. आता पालघर जिल्हाधिकारी प्रशासनाने गुजराती भाषेत काढलेल्या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेच्या पत्रकाने वादाला तोंड फुटले आहे.

'त्यांना' मराठीचा पुळका नाही

सीमेलगत गुजरातच्या भिलाड येथे रेल्वे अंडर पास नवीन सिमेंट बोगद्याचे काम १८ जानेवारीपासून सुरू असल्याने हा मार्ग बंद आहे. परंतु तेथील प्रशासनाने मराठीतून वाहतूक सूचना असलेले पत्रक काढलेले नाही. पालघर जिल्ह्यातील मराठी भाषिक वाहनचालक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र तेथील प्रशासनाला मराठीचा पुळका नाही, पालघर प्रशासनाने का गुजराती भाषेतून पत्रक काढले या मुद्द्यावर प्रशासन टीकेचे धनी झाले आहे.

Web Title : पालघर: गुजरात या महाराष्ट्र? गुजराती नोटिस पर आक्रोश।

Web Summary : पालघर प्रशासन के राजमार्ग बंद करने के गुजराती नोटिस से विवाद। गुजरात सीमा के पास मराठी पर गुजराती को प्राथमिकता देने से स्थानीय लोग नाराज हैं, प्रशासनिक प्राथमिकताओं पर सवाल उठा रहे हैं।

Web Title : Palghar: Gujarat or Maharashtra? Gujarati notice sparks outrage.

Web Summary : Palghar administration's Gujarati traffic notice regarding highway closure sparks controversy. Locals are angered by the preference for Gujarati over Marathi, questioning administrative priorities near the Gujarat border.