शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय इमारत सील करण्याचे आदेश

By admin | Updated: September 21, 2015 01:22 IST

मुरबाड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. परंतु, तत्कालीन ग्रामपंचायतीने शासकीय जमिनीवर केलेल्या बांधकामात अटीशर्तीचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी

मुरबाड : मुरबाड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. परंतु, तत्कालीन ग्रामपंचायतीने शासकीय जमिनीवर केलेल्या बांधकामात अटीशर्तीचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी मुरबाड नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत व व्यापारी गाळे सील करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.वाणिज्य प्रयोजनार्थ बांधलेल्या भाजीपाला मार्केटमधील ७९ गाळे दहा वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यासही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ग्रामपंचायतीने परवानगी घेतली. २००० साली घेतलेल्या या आदेशाची मुदत २०१० साली संपली आहे. परंतु, भाडेपट्ट्याची थकीत रक्कम पूर्ण वसूल झाल्याशिवाय ग्रामपंचायतीच्या कब्जे हक्काने जागा मागणी अर्जावर कारवाई करता येत नसल्याबाबत कळविले. यानंतर, १ फेब्रुवारी २०१० रोजी ग्रामपंचायतीने सदरच्या बांधकामास मंजुरी मिळण्याबाबतची मागणी केली असता ती फेटाळली. तरीसुद्धा, ग्रामपंचायतीने संकुलाशेजारी नवीन ३३ गाळ्यांचे अनधिकृतरीत्या बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे.संतोष जाधव यांनी हा प्रकार जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणून याप्रकरणी कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. चौकशीअंती जिल्हाधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ती होत नसल्याने तर्कवितर्क काढले जात आहेत. याबाबत, तहसीलदार तथा प्रशासक नगरपंचायत मुरबाड यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी याविषयी बोलणे टाळले. तसेच परवानगी घेण्यात आली असून त्याचे जिल्हाधिकारी प्रशासनाने अवलोकन केलेले नाही. केवळ, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप करून श्रेय घेण्याचा प्रयत्न असल्याचे मुरबाडचे माजी सरपंच अर्जुन शेळके यांनी नमूद केले.