शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे केवळ 44 लाख डोस उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 04:41 IST

राज्याला लसीच्या साठ्याची वाढती गरज : वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीचे केवळ ४४ लाख डोस उपलब्ध आहेत. दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने सुमारे १ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्यामुळे लसीच्या आणखी साठ्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने वेळेवर लसींची उपलब्धता न केल्यास लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.राज्यात आराेग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. त्यात आता नुकतेच सरकारने ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजाराचे रुग्ण आणि ६० हून अधिक वय  तसेच सहव्याधी असणाऱ्या सुमारे १ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. याविषयी, राज्याच्या लसीकरण प्रक्रियेचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले की, खासगी आणि सरकारी-पालिका अशा तिन्ही स्तरांवरील वैद्यकीय संस्थांमध्ये लसीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या आठवड्यात या प्रक्रियेचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने केंद्राकडून लसीची उपलब्धता होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास आहे त्या डोसची उपलब्धता आणि वितरण यावर नियंत्रण ठेवावे लागेल.आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले, ७ मार्चनंतर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण अधिक वेगाने राबविण्याचे सरकारचे निर्देश आहेत. त्यामुळे यासाठी केंद्राकडून लसीच्या उपलब्धतेसाठी मागणी करणे गरजेचे आहे. तर लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनीही केंद्राकडे वेळेवर लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले. सध्या कोविशिल्डचे ३९.८४ लाख डोस आणि कोव्हॅक्सिनचे ४.८ लाख डोस आहेत.

राज्यात काेराेनाचे ७९०९३ सक्रिय रुग्ण संख्याराज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर आहे. मंगळवारी राज्यात ७८६३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ७९०९३ एवढी झाली आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात ५४ जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. मुंबईत ८४९, नागपूर ८०९, पुण्यात ७०३, अमरावती ४८३ एवढे नवीन रुग्ण नोंदवण्यात आले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस