शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis: म्युकरमायकोसिसचे राज्यात दीड हजार रुग्ण, वेळीच उपाय केले तर आजार बरा होऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 07:21 IST

लक्षणे दिसू लागताच जर रुग्ण डॉक्टरांकडे गेला तर तो नुसत्या औषधांनी बरा होऊ शकतो. त्रास वाढू लागला तर औषध व ऑपरेशन या दोन्हीच्या साहाय्याने या रुग्ण वाचू शकतो.

अतुल कुलकर्णी  मुंबई : म्युकरमायकोसिस आजाराचे महाराष्ट्रात दीड हजार रुग्ण आहेत. हा आजार वेळीच लक्षात आला आणि त्यावर तातडीने उपचार झाले तर तो बरा होतो. मधुमेहाच्या रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर, स्वतःच्या शरीरातील साखर वाढू दिली नाही तर हा आजार होत नाही, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकमत’ला दिली. लक्षणे दिसू लागताच जर रुग्ण डॉक्टरांकडे गेला तर तो नुसत्या औषधांनी बरा होऊ शकतो. त्रास वाढू लागला तर औषध व ऑपरेशन या दोन्हीच्या साहाय्याने या रुग्ण वाचू शकतो. हा आजार संसर्गजन्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  डॉ. लहाने म्हणाले, आयसीयूमध्ये ऑक्सिजन देण्यास जे पाणी वापरले जाते ते डिस्टिल्ड वॉटर असले पाहिजे. त्याशिवाय नाकामध्ये बिटाडीन टाकणे, स्टेरॉइडचा कमीत कमी वापर करणे या गोष्टी बारकाईने केल्या पाहिजेत. रुग्ण कोरोनामधून बरा झाल्यावर तीन ते चार आठवड्यांनी हा आजार होण्याचे प्रमाण समोर येत आहे. रेमडेसिविर व स्टेरॉईडचा वापर याचे साइड इफेक्ट रुग्णांवर होत असतात.  आजार लपवू नका. टास्क फोर्सच्या सदस्यांशी रविवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संवाद साधणार आहेत.

मधुमेहाच्या रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यावर स्वतःची साखर नियंत्रणात ठेवली तर हा आजार होण्याची शक्यता मावळते. हा आजार अंगावर काढू नका.     - डॉ. तात्याराव लहाने,     वैद्यकीय शिक्षण संचालक

स्टेरॉईडचा अतिवापर नकोरुग्णांना ९ दिवसांपेक्षा जास्त काळ स्टेरॉईड दिले असेल आणि रुग्ण मधुमेही असेल तर त्यांना हा काळ्या बुरशीचा आजार दिसत आहे. स्टेरॉईडबद्दल डॉक्टरांच्या मनात आस्था असते. कारण ते मृत्यूच्या दारातल्या रुग्णाला परत आणू शकते. पण चांगल्या रुग्णाला मृत्यूच्या दारात नेऊ शकते हे लक्षात घेऊन स्टेरॉइडचा वापर अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे.      - डॉ. संजय ओक,     टास्क फोर्सचे प्रमुख 

कोरोना रुग्णांवर स्टेरॉईडचा भडिमार झाल्यास त्याच्या अतिवापराने म्युकरमायकोसिस आजार होऊ शकतो. या कालावधीत रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. कोरोनामधून बरे झाल्यानंतर रोज कोमट पाण्याने गुळण्या करा. तोंड, नाक साफ ठेवा. ‘ओरल हायजिन’कडे लक्ष द्या.        - डॉ. शशांक जोशी, सदस्य टास्क     फोर्स, ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ 

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर