शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

स्टारबस ऑपरेटरला मनपाची नोटीस

By admin | Updated: May 31, 2014 00:59 IST

बसची दुरवस्था, रॉयल्टीची अपूर्णता व शुल्क वाढीकडे लक्ष वेधत मनपा प्रशासनाने स्टार बस ऑपरेटर वंश नियम इन्फ्र ा प्रोजेक्ट लि. (व्हीएनआयएल) ला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

करोडोची वसुली बाकी : उत्तरासाठी १५ दिवसांचा अवधीनागपूर : बसची दुरवस्था, रॉयल्टीची अपूर्णता व शुल्क वाढीकडे लक्ष वेधत मनपा प्रशासनाने स्टार  बस ऑपरेटर वंश नियम इन्फ्र ा प्रोजेक्ट लि. (व्हीएनआयएल) ला कायदेशीर नोटीस पाठविली  आहे.  या नोटीसमध्ये ऑपरेटरने कराराचे उल्लंघन केल्यामुळे  हे कंत्राट का रद्द करण्यात येऊ  नये, अशी विचारणा केली आहे. येत्या १५ दिवसात नोटीसचे उत्तर द्यावे, असे निर्देश मनपा  आयुक्त श्याम वर्धने यांनी कंत्राटदाराला दिल्याची पुष्टी उपायुक्त संजय काकडे यांनी केली. स्टार बसच्या कंत्राटदाराने २0१४ पर्यंंंत रॉयल्टीचा भरणा केलेला नाही. बस खरेदीची रक्कमही  भरलेली नाही. मोरभवन परिसरातील तिन्ही पार्किंंग स्टॅण्डच्या जाहिराती, अशा विविध प्रकारच्या  शुल्कापोटी मनपाचे ८ कोटी २५ लाख ६५ हजार १६४ रुपये कंत्राटदारावर आहे. केंद्र  सरकारकडून मनपाला २४0 बसेस मिळाल्या होत्या. त्यासाठी मनपाला ३0 टक्के रक्कम भरायची  होती. मनपाने केलेल्या करारानुसार ही रक्कम व्हीएनआयएलला भरायची होती.  मात्र कंत्राटदाराने  अद्यापही १ कोटी ७९ लाख रुपये भरलेले नाही. या रकमेवर मनपाने २४ टक्के व्याज आकारले  आहे. त्याचबरोबर रॉयल्टीचे २ कोटी ३४ लाख ५३ हजार ८५९ रुपये बाकी आहे. त्यावरही ५६  लाख २८ हजार ९२६ रुपये व्याजाची आकारणी केली आहे.  पार्किंंंगसाठी आंदोलन केल्यानंतर  मोरभवन परिसरात तीन पार्किंंंग स्टॅण्ड उपलब्ध झाले. मात्र पार्किंंंगच्या जागेपोटी कंत्राटदाराने  द्यावयाची रक्कम अद्यापही मनपाला मिळालेली नाही. जाहिरातीच्या स्वरूपात मिळणारी ५0 टक्के  रक्कम जी ४0 लाखावर आहे,  ती मनपाकडे जमा केली नाही.  पटवर्धन शाळा, हिंगणा रोड,  बैद्यनाथ वर्कशॉप व झिरो माईल येथे बस पार्किंंंग करण्यासाठी मनपाने जागा उपलब्ध करून दिली  आहे. या जागेचा १ लाख ४९ हजार ९३२ रुपये किराया सुद्धा भरलेला नाही. मनपा उपायुक्त संजय  काकडे म्हणाले की, कंत्राटदाराकडून करोडो रुपयांची वसुली करण्यासाठी मनपाने कंपनीला  कायदेशीर नोटीस दिली असून, १५ दिवसात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे. कंत्राटदाराकडून उत्तर  आल्यानंतरच करार रद्द करावयाचा किंवा नाही यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. नवीन बस ऑपरेटरसाठी             प्रयत्न सुरू स्टार बसचे संचालन करण्यासाठी चार ऑपरेटर्सनी निविदा भरली आहे. यात ऑपरेटरच्या १00  बसेस सोबत जेएनएनयूआरएम अंतर्गत मिळालेल्या २४0 बसेसचे संचालन करण्याची तयारी  दर्शविली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने कंत्राटदाराला कायदेशीर नोटीस दिली आहे. महापौर  अनिल सोले यांनीसुद्धा मनपाच्या आमसभेत कंत्राटदाराला नोटीस देण्याचे रुलींग दिले होते. सेवानियुक्त न्यायाधीशांची नियुक्ती अडकलीस्टार बसच्या संचालनासाठी करण्यात आलेल्या करारांचे उल्लंघन केल्यामुळे जबाबदार  अधिकार्‍यांची चौकशी करण्यासाठी सेवानवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, असे रुलींग दिले  होते.  यासाठी मनपाने राज्य सरकारकडे परवानगीही मागितली होती. मात्र राज्य सरकारकडून  प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)