शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधण्यासाठी घरांवर नोटीस

By admin | Updated: August 28, 2016 16:13 IST

शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधण्याची सूचना देण्याचा एक वेगळाच प्रयोग जिल्ह्यातील रिसोड पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात येत आहे.

दादाराव गायकवाड /ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 28 - शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधण्याची सूचना देण्याचा एक वेगळाच प्रयोग जिल्ह्यातील रिसोड पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात येत असून, या अंतर्गत शौचालय नसलेल्या घरांवर शौचालय बांधण्याची सूचना देणारी नोटीसच लावण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्यावतीने अत्यंत काटेकोरपणे स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासनाच्या या अभियानांतर्गत निर्धारित केलेले विविध कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने राबवून हे अभियान तडीस नेण्याचा जणू संकल्पच जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग तथा स्वच्छता मिशन कक्षाने केला असून, यासाठी त्यांना जि.प.च्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांचे पदाधिकारी आणि अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे. स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्हाभरात ह्यभेटीगाठी स्वच्छतेसाठीह्ण हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात ३५ हजार कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासह त्यांना शौचालय बांधण्यास प्रेरित करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक पंचायत समिती आपापल्यापरीने वेगवेगळ्या संकल्पना अस्तित्वात आणत असताना रिसोड पंचायत समितीनेही एक वेगळीची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छतेसाठी भेटीगाठी या अभियानात रिसोड तालुक्यात ४ हजार कुटुंबांच्या भेटी घेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, यासाठी पंचायत समितीचे पदाधिकारी हिरीरीने पुढाकार घेत आहेत. गत २२ आॅगस्टपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत तालुक्यात आतापर्यंत ६०० कुटूंबाच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात आले. त्याशिवाय पंचायत समितीने शौचालय नसलेल्या घरांवर शौचालय बांधण्याची सूचना देणारी नोटीस लावण्यास सुरुवात केली आहे. संबंधित कुटूंबप्रमुखाच नावानिशी लावण्यात येत असलेल्या य नोटीसमध्ये असे नमूद करण्यात आले आहे, की ह्यह्यआपण रात असलेल्या घरी शौचालय बांधकाम केले नसून, आपण व आपला संपूर्ण परिवार उघड्यावर शौचास जाता. त्यामुळे आपण आपले व गावकऱ्यांचे आरोग्य आणि परिसरही दुषित करीत आहात. उघड्यावर शौचास बसणे हा दंडनिय अपराध असून,  आपणाविरोधात मुंबई पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व ११७ अंतर्गत सहा महिन्यांची कैद व बाराशे रुपये दंडाची कारवाई होऊ शकते.या आशयाच्या नोटीस आतापर्यंत जवळपास ३०० घरांवर लावण्यात आल्या असून, त्यावर रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि गटसमन्वयकाची स्वाक्षरीही आहे. या अभिनव उपक्रमामुळे रिसोड तालुक्यातील शौचालय नसलेल्या कुटुंबांनी धास्ती घेतली आहेच; परंतु त्यांना स्वच्छतेचे महत्त्वही पटले असून, प्रत्येक कुटूंब शौचालय बांधण्यासाठी प्रेरित होत असल्याचे दिसत आहे.