शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घड्याळ सोडणार, कमळ धरणार?; गणेश नाईक बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 18:43 IST

गणेश नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक भाजपामध्ये जाण्याची शक्यता

नवी मुंबई: शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात जाण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. यानंतर गणेश नाईक बुधवारी (३१ जुलैला) सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सर्व नगरसेवकांसह गणेश नाईक, संजीव नाईक व आमदार संदीप नाईक बुधवारी भाजपामध्ये जातील असे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर आमदार संदीप नाईक यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. नगरसेवकांनी बैठकीमध्ये काय निर्णय घेतला याची माहिती घेतली जात असून त्यानंतरच योग्य ते पाऊल उचलण्यात येईल, असे स्पष्ट केले.  सीबीडी बेलापूरमधील पारसिक हिलवर असलेल्या महापौर बंगल्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीपासून गणेश नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरण्यास सुरुवात केली होती. दोन दिवसांपासून नाईकांच्या पक्षांतराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे महापौर बंगल्यावरील बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. बैठक सुरू होण्यापूर्वी जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी एकही नगरसेवक पक्षांतर करणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्ष बैठकीमध्ये सर्वच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची आग्रही भूमिका मांडली. 

शहराच्या विकासासाठी प्रवाहाबरोबर जाणे आवश्यक असल्याचा सूर सर्व नगरसेवकांनी आळवला. शहराचा विकास करताना महापालिका अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत असते. पण यामधील काही निर्णयांना राज्य शासनाकडून मंजुरी मिळत नाही. काही निर्णय वेळेत होत नाहीत. यामुळे शहराचा विकास अपेक्षित गतीने होत नाही. शहराचा विकास करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली.
बैठकीपूर्वी कोणीही पक्षांतर करणार नाही, असे सांगणारे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी बैठकीनंतर नगरसेवकांनी पक्षांतराची भूमिका मांडली असल्याचे मान्य केले. सर्वांनीच एकमुखाने प्रवाहाबरोबर जाण्याची मागणी केली असून या भावना गणेश नाईक यांच्यापर्यंत पोहोचवणार असून त्यांच्याकडे पक्षांतरासाठी आग्रह केला जाणार असल्याचे सुतार यांनी सांगितले. या प्रकरणी अंतिम निर्णय त्यांचाच असेल असेदेखील सुतार यांनी स्पष्ट केले. या बैठकीनंतर नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.   

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका