शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतील संवाद, विश्वास संपला - बबनराव पाचपुते

By admin | Updated: August 14, 2014 11:56 IST

राष्ट्रवादीतील विश्वास आणि संवाद संपला आहे. पक्ष संघटनाच यामुळे अडचणीत आली आहे, अशी खेदयुक्त प्रतिक्रिया माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी केले आहे

अहमदनगर : राष्ट्रवादीतील विश्वास आणि संवाद संपला आहे. पक्ष संघटनाच यामुळे अडचणीत आली आहे, अशी खेदयुक्त प्रतिक्रिया नोंदवत पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेले माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. दरम्यान, १८ रोजी भाजपा प्रवेशाच्या वृत्ताचा इन्कार करतानाच समर्थक कार्यकर्त्यांनी निर्णय दिला तर राष्ट्रवादीत राहून घरी बसू, असेही ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. आज उशिरा सायंकाळी पाचपुते यांचा भाजपा प्रवेश १८ रोजी होईल, अशी वार्ता पसरली. याबाबत संपर्क केला असता आ.पाचपुते यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना या वृत्ताचा इन्कार केला आहे. मात्र पक्षात आपण एकटे पडलो आहोत, ही भावना त्यांना लपवता आली नाही. ते म्हणाले, आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटलो. आमचे नेते अजित पवार यांच्याकडे गेलो. पण त्यांनी समजूनच घेतले नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले, या तक्रारी असतील तर त्याचा खुलासा करण्याची संधी मिळाली पाहिजे होती. मात्र पक्षात ऐकूनच घेतले जात नाही. याप्रकारे संवाद आणि विश्वास संपला तर पक्ष संघटना पुढे कशी वाढणार, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, आपण बोलतोय हे सर्वांच्याच मनात आहे. पण बोलण्याची हिंमत होत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शरद पवार आमचे नेते होते, आजही आहेत, असेही ते म्हणाले. मनातील खंंत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मांडली होती, असा नवा खुलासाही आ.पाचपुते यांनी आज केला. मात्र त्यानंतरही पक्षाकडून दखल घेण्यात आलेली नाही, याची कबुलीही त्यांनी दिली. यामुळेच समर्थक कार्यकर्त्यांकडून पक्ष सोडण्याचा दबाव वाढला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, भाजपाकडून संपर्क झाल्याचा दुजोरा त्यांनी दिला. मात्र पक्षप्रवेशाचा निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगीतले. १५ आॅगस्ट रोजी श्रीगोंद्यात समर्थकांचा मेळावा होईल. या मेळाव्यात होणारा निर्णय आपल्याला मान्य राहील. पक्षातच राहण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी दिला, तरी त्याचा आदर राखत आपण घरी बसू, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)