शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र नव्हे, मौनेंद्र मोदी!

By admin | Updated: July 30, 2014 02:50 IST

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारच्या धोरणांवर मौन धारण केलेल्या मोदींचा उल्लेख ‘मौनेंद्र मोदी’ अशा उपहासात्मक शब्दांत केला.

मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र : केंद्र सरकारच्या धोरणांवर पंतप्रधानांचे मौन 
मुंबई : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी गप्प का, असा सवाल करीत त्यांची हुकूमशहासारखी कार्यशैली असून लोकशाहीसाठी ती अत्यंत घातक असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना केली. सरकारच्या धोरणांवर मौन धारण केलेल्या मोदींचा उल्लेख त्यांनी ‘मौनेंद्र मोदी’ अशा उपहासात्मक शब्दांत केला.
निवडणुकीपूर्वी मोदी यांनी जी स्वप्ने दाखविली होती, ती आता भंगली आहेत. त्यामुळेच उत्तराखंडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत लोकांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी भाजपाला नाकारून काँग्रेसच्या पारडय़ात आपले मत टाकले, असे सांगून चव्हाण म्हणाले, की  गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना मोदींची कार्यपद्धती हुकूमशहासारखी होती, हे काँग्रेसला माहिती होते. त्यामुळे पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिल्लीतही हुकूमशाही येण्याचा धोका व्यक्त केला होता. आता हे सर्व लोकांसमोर आले. 
केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्र्यांना कसे वागविले जाते, मंत्र्यांना किती स्वातंत्र्य दिले जाते, कोअर टीममध्ये कोण कोण मंत्री आहेत, या सगळ्य़ावरून हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारविरोधात ब:याच मुद्दय़ांवरून लोकांचा रोष होता, मोदींनी स्वत:चे मार्केटिंग करण्यासाठी त्याचा उपयोग केला. मोदींनी एखादी टुथपेस्ट किंवा साबणाप्रमाणो स्वत:ची विक्री केली. त्यासाठी त्यांनी मार्केटिंगचे तंत्र, जाहिरातबाजीचे कसब आणि इतरही क्लृप्त्यांचा आधार घेतला, हे सांगण्यासही मुख्यमंत्री विसरले नाहीत. (वृत्तसंस्था)
 
मुख्यमंत्री म्हणाले..
लोकांनी मोदी सरकारची तुलना काँग्रेस सरकारबरोबर करण्यास सुरुवात केली 
आहे. जेथे मंत्र्यांना सन्मान दिला जात होता, दैनंदिन संवाद होता. त्यांच्यावर निश्चित अशी जबाबदारी होती. ते सगळे आता 
गायब झाले आहे. 
 
केवळ टि¦टरवर प्रतिक्रिया 
मोदी केवळ टि¦टरवर प्रतिक्रिया देतात. हे टि¦ट नेमके त्यांनी केले आहेत की, एखाद्या कार्यक्षम अधिका:याने किंवा पक्षाच्या कार्यकत्र्याने, हे समजण्यास 
वाव नसतो.
 
मोदी गप्प का?
परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, सामाजिक विषय, समान नागरी कायदा, राममंदिर, कलम 37क् यावर पंतप्रधान म्हणून मोदींनी अद्याप आपले मत स्पष्टपणो मांडलेले नाही. त्यांनी केवळ लोकांना स्वप्नं दाखविण्याचे काम केल्याचे चव्हाण म्हणाले.