शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 18:13 IST

Narayan Rane : राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणाच्या दौऱ्यावर गेले होते.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होतेमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामधून कोकणाला काय मिळाले, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहेखासदार म्हणून मुख्यमंत्र्यांना मदत करण्यास कधीही तयार

सिंधुदुर्ग - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामधून कोकणाला काय मिळाले, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडी येथील जत्रेस जात भराडीदेवीचे दर्शन घेतले. तसेच कोकणातील विकासकामांचा आढावा घेत काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मात्र उद्धव ठाकरे यांच्या  या दौऱ्यावर नारायण राणे यांनी टीका केली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

रत्नागिरी अन् सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजना, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

...अन् शिवसैनिकाच्या मदतीला धावले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

ह्या शिवसेनेचा नेमक्या चल्ला तरी काय? उद्धव ठाकरेंचा नाणारला विरोध; शिवसैनिकांचं मात्र समर्थन''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील विकासकामांसाठी कुठलाही निधी देण्याची घोषणा केलेली नाही. सी वर्ल्ड प्रकल्पाला एकेकाळी शिवसेनेने विरोध केला होता. मात्र आता त्या प्रकल्पाची बांधणी खासगी गुंतवणुकीतून करण्याची तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी कोकणाबाबत माहिती घेतली पाहिजे. चिपी विमानतळाच्या कामाबाबत राज्य सरकार कमी पडत आहे.  त्यांच्या आजच्या कोकण दौऱ्यातून कोकणाला काय मिळाले हा प्रश्नच आहे. सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, असे नारायण राणे म्हणाले.  तसेच खासदार म्हणून मुख्यमंत्र्यांना मदत करण्यास कधीही तयार असल्याचेही राणेंनी सांगितले. 

दरम्यान, नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही मोठे भाकीत केले आहे. भाजपा राज्यातील सरकार जेव्हा पाडायचे तेव्हा पाडणार, त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आव्हान देण्याची गरज नाही. सध्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. काल रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव यांच्या कृतीमधून हा असंतोष दिसला होता. एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, '' असे भाकीतही राणेंनी केले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण