शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:34 IST

Mumbai and Navi Mumbai Water Supply News: मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाणी जपून वापण्याचे आवाहन करण्यात आले.

Water Cut News: मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईत शुक्रवारी (१८ जुलै २०२५) आणि मुंबईत शनिवारी (१९ जुलै २०२५) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद राहणार आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
मुंबईतील टी वॉर्ड आणि मलबार हिल परिसरात शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून पुढील १२ तास पाणीपुरठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली. मुलुंड पश्चिम येथील वीणा नगरमधील योगी हिल रोडवरील ६०० मिलीमीटर वासाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना नियमितपणे पाणीपुरवठा केला जाईल.

नवी मुबंईत १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार!
नवी मुंबईत  शुक्रवारी सकाळी १०.०० ते शनिवारी पहाटे ०४.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या कालावधीत नवी मुंबईच्या मोठ्या भागांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या १७०० मिमी व्यासाच्या मोरबे पाईपलाईनला नवीन पाईपलाईन जोडली जाणार आहे. परिणामी, नवी मुंबईतील ऐरोली, बेलापूर, नेरुळ, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, घणसोली आणि वाशी भागांत पाणीपुरवठा बंद असेल.शनिवारी संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेने दिली. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करण्याचे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणी कपातMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्रnmmcनवी मुंबई महापालिका