शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकार पुन्हा लॉकडाऊनच्या विचारात?; मुंबईच्या महापौरांनी दिले महत्त्वाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 15:08 IST

mumbai mayor hints lockdown in maharashtra: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिल्यास सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई: मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. या दोन आठवड्यात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याशिवाय राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या अशाच प्रकारे वाढत राहिल्यास राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं पेडणेकर म्हणाल्या. (mumbai mayor kishori pednekar hints about lockdown)Exclusive: पुणेकरांना सर्वात आधी द्या कोरोना लस; मोदी सरकार घेणार का 'त्या' पत्राची दखल?गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर अतिशय सूचक भाष्य केलं. 'गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्णांचं प्रमाण अशाच प्रकारे वाढत राहिल्यास महापालिकेला कठोर निर्णय घ्यावे लागतील,' असं पेडणेकर म्हणाल्या. कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ होत असून मृत्यूचं प्रमाणदेखील दिसू लागल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं.कोरोना रुग्ण वाढत असल्याने कठोर निर्णय घ्यावे लागतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेतमुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली. तेव्हापासून कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. लोक स्वत:ची काळजी घेत नसतील तर लॉकडाऊन करण्याची वेळ येईल. तशी चिंता राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. प्रत्येकानं स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांना जपायला हवं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक काळजी घ्यायला हवी. तरच आपण कोरोनाची दुसरी लाट थोपवू शकू, असं पेडणेकर म्हणाल्या. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिल्यास मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे लॉकडाऊनचे संकेत दिले.मुंबईतील लोकलबाबत २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार? गेल्या दोन आठवड्यांत कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

थोड्याच वेळात मुख्यमंत्री घेणार राज्यातील स्थितीचा आढावाकोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडून जिल्ह्यांमधील परिस्थिती जाणून घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेKishori Pednekarकिशोरी पेडणेकर