शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
5
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
6
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
7
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
8
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
9
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
10
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
11
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
12
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
13
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
14
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
15
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
16
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
17
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
18
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
19
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
20
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी; लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला जमा होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 17:10 IST

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : मुंबई : बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला मिळणार आहे. त्यामुळं रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे. आतापर्यंत १ कोटी ४० लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १ कोटी अर्जांची छानणी सुद्धा पूर्ण झालेली आहे. या योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे १७ ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात वितरीत केले जाणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. 

या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. दरम्यान, १७ जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच ३ हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यात थेट जमा होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिलांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून आता त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १ कोटी ४० लाख १० हजार २१५ अर्ज ऑनलाईन भरण्यात आले आहेत. त्यापैकी १ कोटी अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे. त्यात ८३ टक्केहून अधिक अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. तर जवळपास १२ हजार अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस