शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महाविकास आघाडीसाठी लवकरच हालचाली - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 06:11 IST

राऊत यांनी शनिवारी शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी रविवारी माध्यमांना दिली.

मुंबई : देशाला एका उत्तम विरोधी आघाडीची गरज आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही आदर्श आघाडी आहे. राष्ट्रीय पातळीवरही अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती सध्या ठीक नाही, पण लवकरच यासंदर्भात हालचाली सुरू होतील, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी दिली.

राऊत यांनी शनिवारी शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी रविवारी माध्यमांना दिली. जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करत आहे, अशाचप्रकारे आघाडी आपण देशात उभी करू शकतो का, यासंदर्भात पवार यांच्याशी चर्चा झाली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जी मुसंडी मारली ती जबरदस्त आहे, पण भविष्यात देशात एक आघाडी निर्माण व्हावी, ही सगळ्यांची इच्छा आहे. त्यासाठी नवीन नेतृत्वच हवे असे नाही, पण एकत्र बसून ठरवायला हवे, असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवसेनेने तीन कोविड सेंटर उभारले आहेत. सरकारला समांतर अशी कोविड सेंटर व यंत्रणा राजकीय कार्यकर्तेही उभी करत आहेत. त्यामुळे सरकारचा भार कमी होत आहे. हे इतर राज्यांमध्ये झाले नाही. आता अनेक संघटना, संस्था काम करतात, पण त्यांना शिवसेनेसारखे काम करता आले नाही. आज अनेक राज्यांमध्ये ज्या चिता पेटलेल्या दिसत आहेत, कब्रस्तानात जागा नाही हे चित्र जगात गेले आहे, त्याचे कारण हेच आहे, असे राऊत म्हणाले.

आघाडीचा आत्मा काँग्रेस पक्ष आहे!
प्रत्येकाला वाटते मीच नेता आहे, पण तसे नाही, आघाडी अशी निर्माण होत नाही. भविष्यात विरोधी पक्षाची भक्कम आघाडी उभी करावी आणि एक आव्हान उभे करावे, अशी सगळ्यांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही. अलीकडच्या निवडणुकांत काँग्रेसला यश मिळाले असले तरी काँग्रेसने अजून मुसंडी मारणे जास्त गरजेचे आहे, असे राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस