शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

इंदोरीकर महाराजांच्या केसाला धक्का लावून दाखवा ; मग बघा काय होते ते : तृप्ती देसाईंना मनसेचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 16:10 IST

तृप्ती देसाई यांना दिली शूर्पनखेची उपमा

ठळक मुद्देदेसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाईची केली मागणीकिर्तनाच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती, तरुणांना शिक्षण आदी विषयांवर वेळोवेळी प्रबोधन

पुणे : हभप निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर महाराजांच्या दिलगिरीनंतरही त्यांना काळे फासण्याचा इशारा दिलेल्या तृप्ती देसाईंसमोर आता मनसेचे आव्हान उभे राहिले आहे. इंदोरीकर महाराजांच्या केसाला धक्का लावून दाखवा, मग बघा काय होते ते असा सज्जड दमच मनसेच्यामहिलाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी भरला आहे. तृप्ती देसाई या रामायणातील शुर्पनखेसारख्या वागत असून वैचारिक विकृती दाखवित असल्याचे पाटील म्हणाल्या. हभप निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी त्यांच्या कीर्तनादरम्यान सम-विषम तिथींचा दाखला देत संततीप्राप्तीबाबत केलेल्या वक्तव्याचा अंधश्रद्धा निर्मुलन संस्था आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी निषेध केला होता. देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मंगळवारी अहमदनगरला जाऊन पोलीस अधिक्षकांची भेट घेतली होती. आठ दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन तोंडाला काळे फासू असा इशारा दिला आहे. याविषयावरुन वादंग उठल्यानंतर इंदूरीकर महाराजांनी लेखी दिलगिरी व्यक्त केली. मात्र इंदुरीकर महाराजांनी माफी  मागितलेली नसल्याचे सांगत देसाई यांनी काळे फासण्याचा तसेच मुख्यमंत्र्यांना दालनात कोंडण्याचा इशारा दिला आहे. 

या गदारोळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देसाई यांचा समाचार घेत त्यांना शुर्पनखेची उपमा दिली. शुर्पनखेची विकृती ठेचण्याकरिता तिचे नाक कापावे लागले होते. तसेच महाराजांना काळे फासण्याचा प्रयत्न जरी केला तरी कोणाचे तोंड काळे होते ते पहा. देसाईंचे अति होत चालले आहे. महाराजांनी केलेल्या सामाजिक प्रबोधनाकडे दुर्लक्ष का केले जातेय. आपल्या किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती, कुटुंब पद्धती, तरुणांना शिक्षण व रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण आदी विषयांवर वेळोवेळी प्रबोधन केल्याचे पाटील म्हणाल्या. देसाई यांची संस्था रजिस्टर नसून त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल आहेत. हा विनाकारण वाद निर्माण करुन सवंग प्रसिद्धीचा प्रयत्न असल्याचा आरोप पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. 

टॅग्स :Puneपुणेindurikar maharajइंदुरीकर महाराजMNSमनसेWomenमहिला