शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला शाप लागतील; मूकबधिरांना झालेल्या मारहाणीवरुन राज ठाकरे बसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 21:35 IST

सरकारला फक्त खाबुगिरीत रस असल्याचा राज यांचा आरोप

पुणे: मूकबधिरांना झालेल्या मारहाणीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारवर बरसले आहेत. ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, अशांवर लाठीमार कसला करता?, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मूकबधिरांना शिकण्याची, स्वत:च्या पायांवर उभं राहण्याची इच्छा आहे. शिक्षक मिळावेत, यासाठी ते आंदोलन करत आहेत. मात्र सरकार त्यांच्यावर लाठीमार करत आहे. या सरकारला नक्कीच त्या मुलांचे शाप लागतील, अशा शब्दांमध्ये राज यांनी सरकारला लक्ष्य केलं. राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्या मुलांची भेटदेखील घेतली.मूकबधिरांना पोलिसांकडून मारहाण होते, ही गोष्ट अतिशय दुर्देवी असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 'मूकबधिरांना मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले, हा प्रश्न आहे. ज्यांनी हे आदेश दिले, त्यांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा घ्यावा,' अशी मागणी राज यांनी केली. आंदोलनकर्त्या मुलांच्या मागणीत चुकीचं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'त्या मुलांना शिक्षण घ्यावंसं वाटतं आहे. त्यांना शिकायचं आहे. त्यासाठी त्यांना शिक्षक हवेत. त्यामध्ये चुकीचं काय?' असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही अधिकारी ऐकत नसतील, तर मग सरकारचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी विचारला. मूकबधीर मुलांची भेट घेतल्यानंतर राज यांनी फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. सरकार फक्त खाबुगिरीत गुंग आहे. त्यांना या मुलांशी काहीही देणंघेणं नाही. फक्त पैशांवर निवडणुका जिंकायच्या आणि पैसा कमवायचा हेच सुरू आहे. त्यामुळे आता या सरकारला आधीच्या सरकारला दोष देण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे सरकारवर बरसले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू, असंदेखील त्यांना सांगितलं. ठिय्या दिलेल्या मुलांची सोय करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस