शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंचा एका ओळीत समाचार; महाविकास आघाडीवरुन 'राज'गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 8:46 PM

राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सरकार स्थापन केलेल्या उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या नव्या झेंड्याची चर्चा सुरू होती. मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रेवरुन वादही झाला. मनसेचा भगव्या झेंडा समोर आल्यानंतर आता पक्ष हिंदुत्त्वाच्या दिशेनं जाणार का, अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर भाष्य करताना भगवा हाच माझा डीएनए आहे. मी अनेकदा मराठीसाठी आणि हिंदुत्वासाठी भूमिका घेतलेली आहे. तुम्ही हिंदुत्वाकडे जात आहात का, असा प्रश्न विचारणारे तेव्हा कुठे होते, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मुंबईतल्या गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते.माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केल्यास मी मराठी म्हणून अंगावर जाईन आणि कोणी माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न केल्यास मी हिंदू म्हणून त्याचा समाचार घेईन, अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'आझाद मैदान परिसरात रझा अकादमीनं हैदोस घातला. पोलिसांवर हात टाकण्यात आले, तेव्हा त्यांच्याविरोधात कोण रस्त्यावर उतरलं होतं ते लक्षात असू द्या. पाकिस्तानी कलाकारांविरोधात कोणीही बोलायला तयार नव्हतं. त्यावेळी त्यांच्याविरोधात भूमिका घेणारी मनसेच होती. दहीहंडीच्या थरांवर निर्बंध आणले गेले, त्यावेळी मीच आवाज उठवला होता,' याची आठवण राज ठाकरेंनी करुन दिली. पक्षाचा झेंडा बदलल्यावर अनेकांना प्रश्न पडले. पण मी काही धर्मांतर केलेलं नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो, अशा शब्दांत राज यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करुन मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. यावेळी त्यांनी धर्माबद्दलची भूमिका स्पष्ट केली. धर्म प्रत्येकानं आपल्या घरात ठेवावा. मशिदींवरील भोंगे उतरले पाहिजेत हे मी फार आधीच म्हटलं होतं. आमची आरती त्रास देत नाही. मग तुमचा नमाज का त्रास देतो? नमाजाला भोंगे कशाला हवेत?, असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेShiv Senaशिवसेना