शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 00:37 IST

या घटनेची गंभीर दखल घेत सिव्हिल सर्जन डॉ. शिवकुमार प्रसाद चक्रवर्ती यांनी अन्न निरीक्षकांना (Food Inspector) या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.


उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे कलिंगड आता घातक ठरू लागले आहे. मुंबईतील घटनेनंतर आता बिहारमधील बक्सर जिल्ह्यात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ८ जणांची प्रकृती अचानक खालावल्याची घटना घडली आहे. येथील औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनवर्षा गावात ही घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात, सदर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला तत्काळ 'हायर सेंटर'मध्ये हलवण्यात आले आहे. तर इतर ७ जणांवर स्थानिक रुग्णालयातच उपचार करण्यात आले. यांपैकी ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोन जणांवर उपचास सुरू आहे. लीलावती देवी आणि त्यांची मुलगी गीता देवी अशी उपचास सुरू असलेल्या रुग्णांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने दुपारच्या वेळी बाजारातून आणलेले कलिंगड खाल्ले. यानंतर काही तासांतच लहान मुलांसह घरातील सर्वांना उलट्या, जुलाब, पोटदुखी सुरू झाली आणि अस्वस्थही वाटू लागले. परिस्थिती अधिक बिघडू लागल्यानंतर, शेजाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची गंभीर दखल घेत सिव्हिल सर्जन डॉ. शिवकुमार प्रसाद चक्रवर्ती यांनी अन्न निरीक्षकांना (Food Inspector) या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. कलिंगड लवकर पिकवण्यासाठी किंवा ते अधिक लाल दिसण्यासाठी वापरले जाणारे नायट्रेट, कृत्रिम रंग (एरिथ्रोसिन) अथवा कार्बाइड यांसारख्या रसायनांमुळे ही विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. महत्वाचे म्हणजे, उन्हात ठेवलेल्या किंवा खूप वेळ कापून ठेवलेल्या फळांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Watermelon proves costly: Eight family members poisoned in Buxar

Web Summary : Eight family members in Buxar, Bihar, suffered poisoning after eating watermelon. They experienced vomiting, diarrhea, and stomach pain. Doctors suspect chemical contamination. An investigation is underway, and health officials are urging caution.
टॅग्स :BiharबिहारfruitsफळेHospitalहॉस्पिटलMarketबाजार