IPL 2026 RR vs GT : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५२ वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात २३० धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीनं षटकारासह खाते उघडत इतिहास रचला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर षटकार मात त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण केले. सर्वात जलद आणि कमी वयात हा डाव साधणारा तो पहिला फलंदाज ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेहराची चाल अन् DSP सिराजचं मॅजिक
२०० पारची लढाई जिंकण्यासाठी त्याने आक्रमक अंदाजात सुरुवात केली. पण मोहम्मद सिराजनं १६ चेंडूत ३६ धावांवर त्याच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. GT चा प्रशिक्षक आणि भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहरानं डगआउटमधून खेळलेली चाल अन् मोहम्मद सिराजच्या मॅजिकची कमाल या सुरेख ताळमेळासह वैभव सूर्यवंशीच्या रुपात गुजरात टायटन्सला मोठ यश मिळालं.
वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीला असा लागला ब्रेक
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूपासून वैभव सूर्यवंशी गोलंदाजांवर तुटून पडला. सिराज घेऊन आलेल्या पहिल्या षटकात ५ चेंडूच सामना करताना त्याने ९ धावा काढल्या. कगिसो रबाडाच्या दुसऱ्या षटकात दोन षटकारांसह त्याने १५ धावा कुटल्या. डावातील तिसरे आणि मोहम्मद सिराजच्या दुसऱ्या षटकातही त्याने सलग तीन चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. पण या षटकात डगआउटमधून नेहरानं डोक्यानं बॉलिंग करा, असे म्हणत सिराजला बाउन्सर मारण्याचा इशारा केला. सिराजनेही वेळ न घालवता कोचचा सल्ला लगेच फॉलो केला अन् वैभव सूर्यवंशी त्याच्या जाळ्यात अडकला. अर्शद खान याने कोणतीही चूक न करता युवा स्फोटक बॅटरचा झेल टिपला. वैभव सूर्यवंशीनं १६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३६ धावांचे योगदान दिले.
छोट्याखानी खेळीत विक्रमांची 'बरसात'
वैभव सूर्यवंशी हा यंदाच्या हंगामात कमालीच्या फॉर्ममध्ये दिसत आहे. गुजरात विरुद्धच्या सामन्यात टी-२० मध्ये १०० षटकार मारण्याचा विश्वविक्रमी डाव साधण्यासोबतच यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ३० षटकारासह त्याने अभिषेक शर्माला मागे टाकले. एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या बॅटर्सच्या यादीत तो ४० षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पुढच्या ३ सामन्यात ३ षटकारासह आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मोडा विक्रम त्याला खुणावत आहे. या यादीत अभिषेक शर्मा अव्वलस्थानी असून २०२४ च्या हंगामात त्याने ४२ षटकार ठोकले होते.
Web Summary : In the IPL match between RR and GT, Vaibhav Suryavanshi's explosive start was cut short by Mohammed Siraj. A strategic move by GT coach Ashish Nehra led to Suryavanshi's dismissal after a quickfire 36, showcasing a crucial tactical victory.
Web Summary : RR और GT के बीच आईपीएल मैच में वैभव सूर्यवंशी की विस्फोटक शुरुआत को मोहम्मद सिराज ने रोका। जीटी कोच आशीष नेहरा की एक रणनीतिक चाल के कारण सूर्यकुमार को 36 रन पर आउट कर दिया गया, जो एक महत्वपूर्ण सामरिक जीत थी।