शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालय लाचखोरी प्रकरण : नरहरी झिरवळ यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 14:10 IST

Ministry bribery case: मंत्रालयातील  अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्यानं खळबळ उडाली असून, या लाकखोरीमुळे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ  अडचणीत सापडले आहेत.

मंत्रालयातील  अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्यानं खळबळ उडाली असून, या लाकखोरीमुळे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ  अडचणीत सापडले आहेत. तसेच विरोधी पक्षातील काँग्रेसने झिरवळ यांचाय राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांनी “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका घेतली आहे. मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने निष्पक्ष चौकशीसाठी झि तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्षन सपकाळ यांनी म्हटले आहे.

मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागात झालेल्या लाचखोरीबाबत सोशल मीडियावरून दिलेल्या प्रतिक्रियेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यामुळे लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालय सील केले आहे. या घटनेने राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

‘’चौकशीदरम्यान वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे या कर्मचाऱ्याृने सांगितल्याची माहिती समोर येतेय. हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांनी “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका मांडली आहे. मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर  निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Minister under fire: Congress demands resignation over bribery case.

Web Summary : Following a bribery arrest in the Food and Drug Administration, Congress demands Minister Narhari Zirwal's resignation for fair investigation. Zirwal pledges resignation if implicated.
टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणNarhari Jhariwalनरहरी झिरवाळMantralayaमंत्रालयHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेस