शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकलूजमध्ये पोलिसांवर सामूहिक हल्ला

By admin | Updated: February 11, 2016 01:33 IST

रात्रीच्या वेळी दरोडा प्रतिबंधक गस्तीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला करुन तीन पोलिसांना जखमी केल्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुतण्या सत्यशील मोहिते-

पंढरपूर : रात्रीच्या वेळी दरोडा प्रतिबंधक गस्तीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला करुन तीन पोलिसांना जखमी केल्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुतण्या सत्यशील मोहिते-पाटीलसह १० जणांना अटक करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री अकलूजमध्ये घडला. दरम्यान सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता सर्वाना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री एकच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम विष्णु कोरके हे दरोडा प्रतिबंधासाठी गस्त घालत असताना स्मृतीभवन (शंकरनगर) समोर बरेच लोक रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांना काठी, ऊस व हाताने मारहाण करत असल्याची माहिती त्यांना फोनवरुन मिळाली. त्यावरून कोरके हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मारहाण करणाऱ्या तरुणांना मज्जाव केला असता आकाश गवळी व दीपक दत्तात्रय गायकवाड यांनी कोरके, पोलीस शिपाई इंगोले आणि चौगुले यांना काठी, ऊस व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी कोरकेंसह सहकाऱ्यांच्या गालावर, हातावर, पाठीवर व पायावर मुका मार लागला.या सर्व गोंधळात फौजदार गोसावी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी तिरूपती काकडे, पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे व इतर कर्मचाऱ्यांना सदर मारहाणीची मोबाईलवरून कल्पना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी तिरूपती काकडे व पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. (प्रतिनिधी)