शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 12:08 IST

Malshiras Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result : माळशिरस मतदारसंघात यंदा भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत रंगली होती.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : अकलूज : माळशिरस विधानसभा मतदारसंघात (Malshiras Assembly constituency) भाजपचे राम सातपुते यांनी मतमोजणीच्या १६व्या फेरीपर्यंत झुंज दिली. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातून सातपुतेंनी मतांची आघाडी घेत उत्तम जानकरांना काट्याची टक्कर देऊन धाकधूक वाढवली होती; पण १७व्या फेरीपासून पूर्व भागातील मोहिते- पाटील व उत्तम जानकरांच्या हक्कांच्या गावातून जानकरांना मतांची आघाडी मिळाली आणि उत्तम जानकर यांनी १३ हजार १४८ मताधिक्याने राम सातपुते यांचा पराभव केला.

राम सातपुते यांनी आपला पराभव मान्य केला आहे. मात्र यावेळी त्यांनी पराभवाची खापर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर फोडत कारवाईची मागणी केली आहे. माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजपविरोधात काम केले. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या, असा आरोप करत रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी राम सातपुते यांनी ट्विटद्वारे केली आहे.

दरम्यान,  माळशिरस मतदारसंघात यंदा भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत रंगली होती. मात्र, यात राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांनी टफ फाईट देत बाजी मारली. राम सातपुते यांनी मतमोजणीच्या १६व्या फेरीपर्यंत झुंज दिली. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातून राम सातपुतेंनी मतांची आघाडी घेत उत्तम जानकरांना काट्याची टक्कर देऊन धाकधूक वाढवली होती; पण १७व्या फेरीपासून पूर्व भागातील मोहिते- पाटील व जानकरांच्या हक्कांच्या गावातून जानकरांना मतांची आघाडी मिळाली आणि अखेर उत्तम जानकर यांनी १३ हजार १४८ मताधिक्याने राम सातपुते यांचा पराभव करीत विजयाला गवसणी घातली.

विजयाचे फॅक्टर- मतदारसंघात मोहिते-पाटील व जानकर दोन गट एकत्र आलेले होते. मोहिते-पाटलांची मोठी साथ मिळाली. -  लोकसभेच्या निवडणुकीनंतरही शरद पवार गटाचा प्रभाव कायम राहिला. त्यामुळे 'तुतारी'कडे जनता कायम राहिली. -  भाजपचे उमेदवार बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याचे सांगत प्रचार केला. त्याचाही परिणाम थोडा फार दिसला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ram satputeराम सातपुतेmalshiras-acमाळशिरसBJPभाजपा