शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 17:10 IST

Mahayuti Seat Sharing Formula: जरांगे पाटील यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले. 

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी गायकवाड यांचे समर्थन करत नाही. पण आरक्षणाचे खरे मारेकरी हे काँग्रेस आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच महायुतीतील ८०-९० जागा लढविणार असा जागावाटपाचा फॉर्म्युलाच संपला असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. 

 आम्ही आरक्षण रद्द करू असे राहुल गांधी म्हणाले. नेहरू, राजीव गांधी आता राहुल गांधी, काँग्रेसच्या तीन पिढीच्या जे  पोटात होते ते आज त्यांच्या ओठात आले. NDA सरकार संविधान बदलणार असे वक्तव्य करत होते. खरंतर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. खऱ्या आरक्षणाचे मारेकरी हे काँग्रेस आहे. जरांगे पाटील यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले. 

महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे अभिनंदन करायचे आहे. या नेत्यांनी ८० नाही ९० नाही कुठलाही आकड्यावर न जाता जिथे अजित पवार जिंकतील तिथे अजित पवार लढतील,  जिथे शिंदे गटाचे आमदार जिंकतील तिथे त्यांचा आग्रह,  जिथे आमचे उमेदवार तेथे आमचा आग्रह मान्य केले जाणार आहे. फक्त निवडून येणारे उमेदवार देऊ, हा महायुतीचा आग्रह असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.  

तसेच काँग्रेसचा मुस्लिम आमदार फडणवीसांच्या बंगल्यावर गेल्यावरूनही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणपती दर्शनासाठी अमिन पटेल गेले होते, यात नवीन आणि राजकारणासारखा काही मुद्दा नसल्याचे ते म्हणाले. 

जागावाटपावर लवकरच घोषणा...

महायुतीत ७० टक्के जागांवर एकमत झालेले आहे. तिन्ही नेते पत्रकार परिषद घेतील. महाविकास आघाडी पूर्वी महायुतीचा फार्मूला आपल्या सर्वांना दिसेल असा दावा करतानाच सर्व्हेबाबतची अनौपचारिक चर्चा आपल्याला माहिती नाही असे सांगितले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे