नवी दिल्ली - हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात यंदा मोसमी हंगामात सुमारे ८० सेंटीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. भारतातील मोसमी पावसाची १९७१ ते २०२० या कालावधीतील दीर्घकालीन सरासरी ८७ सेंटीमीटर आहे. मान्सूनच्या अंदाजात ५ टक्क्यांची त्रुटी (मॉडेल एरर) राहू शकते.‘एल निनो’चा प्रभाव : प्रशांत महासागरामध्ये ‘एल निनो’ स्थिती सक्रिय होत असल्याने मान्सूनच्या पावसावर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे. यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धात म्हणजे जुलै ते सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण अधिक कमी राहू शकते.
दिलासादायक बाब काय?डॉ. मोहपात्रा यांनी सांगितले की, मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) हिंदी महासागरात ‘पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल’ स्थिती निर्माण होऊ शकते. ही स्थिती मान्सूनसाठी पोषक असते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊन ‘एल निनो’चा प्रभाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
शेतीवर काय परिणाम?देशातील अन्नधान्य उत्पादनाचे प्रमुख क्षेत्र असलेल्या मध्य व उत्तर-पश्चिम भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाचा धोका आहे, ज्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी खरीप पेरणी करताना मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होणाऱ्या सुधारित अंदाजाची वाट पाहावी.
Web Summary : India anticipates 80 cm monsoon rain, below the 87 cm average. El Nino threatens reduced rainfall, especially from July-September. A positive Indian Ocean Dipole in August-September could offer relief. Central and Northwest India face potential crop yield impacts. Farmers should await updated forecasts before sowing.
Web Summary : भारत को 80 सेमी मानसून वर्षा का अनुमान है, जो 87 सेमी औसत से कम है। एल नीनो से कम वर्षा का खतरा, खासकर जुलाई-सितंबर से। अगस्त-सितंबर में एक सकारात्मक हिंद महासागर द्विध्रुव राहत दे सकता है। मध्य और उत्तर-पश्चिम भारत में फसल उपज पर संभावित प्रभाव। किसानों को बुवाई से पहले अद्यतन पूर्वानुमान का इंतजार करना चाहिए।