अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नौदलावर या युद्धातील सर्वात कठीण जबाबदारी सोपवली आहे ती म्हणजे इराणच्या बंदरांची नाकेबंदी करणे आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने पेरलेले पाणसुरुंग नष्ट करणे. इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकेने नाकेबंदीचे वेगळे हत्यार उपसले आहे. ही अमेरिकेची नवी रणनीती आहे.
नाकाबंदीचा आंतरराष्ट्रीय कायदा घोषणा आणि सूचना : नाकाबंदीची अधिकृत घोषणा होणे आणि ज्या जहाजांवर याचा परिणाम होऊ शकतो, त्यांना तशी पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे.प्रभावी अंमलबजावणी : नाकाबंदी केवळ कागदावर असून चालणार नाही; ती राबवण्यासाठी अमेरिकेकडे पुरेशा युद्धनौका आणि विमाने असणे आवश्यक आहे.निःपक्षपातीपणा : ही नाकाबंदी सर्वच देशांच्या जहाजांना समान लागू झाली पाहिजे, त्यात कोणताही भेदभाव करता येत नाही.नागरी लोकसंख्या : नाकाबंदीचे मुख्य उद्दिष्ट सामान्य जनतेला त्रास देणे हे नसावे, परंतु युद्धात नागरिकांना होणारी झळ आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य केली जाते.तटस्थ बंदरे आणि सामुद्रधुनी : नाकाबंदीत तटस्थ देशांच्या बंदरांचा मार्ग रोखता येत नाही. म्हणूनच ट्रम्प यांनी इराणशी संबंधित नसलेल्या आंतरराष्ट्रीय जहाजांसाठी हा मार्ग खुला राहील, असे स्पष्ट केले.
नाकाबंदी म्हणजे काय?नाकाबंदी हे 'आर्थिक युद्धाचे' प्रभावी शस्त्र आहे. 'न्यूपोर्ट मॅन्युअल ऑन द लॉ ऑफ नेव्हल' नुसार : नाकाबंदी म्हणजे समुद्रात शत्रूची मालमत्ता किंवा माल जप्त किंवा नष्ट करणे. यामुळे शत्रूला निर्यातीतून महसूल, आयातीतून युद्धसामग्री मिळणे अवघड होते.
लष्करी सामग्रीची गरजही नाकेबंदी यशस्वी करण्यासाठी पेंटागॉनला कमीत कमी खालील कुमक लागेल:दोन एअरक्राफ्ट कॅरिअर स्ट्राईक ग्रुप्स (विमानवाहू युद्धनौकांचा समूह).सामुद्रधुनीच्या प्रवेशद्वारावर सतत गस्त घालणाऱ्या डझनभर युद्धनौका.युद्धाचा धोकाअमेरिकेसाठी ही "हाय रिस्क" (उच्च जोखीम) आहे. जर इराणने या नाकेबंदीला आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन मानले, तर त्याचे रूपांतर लष्करी चकमकीतून मोठ्या युद्धात होऊ शकते.
Web Summary : US employs naval blockade to pressure Iran, targeting ports and mines. International law dictates rules for effective, impartial implementation, avoiding civilian harm. Success requires naval strength, risking escalation if Iran resists.
Web Summary : अमेरिका ने ईरान पर दबाव बनाने के लिए नौसैनिक नाकाबंदी की, जिसमें बंदरगाहों और खानों को लक्षित किया गया है। अंतर्राष्ट्रीय कानून प्रभावी, निष्पक्ष कार्यान्वयन के नियम निर्धारित करता है, नागरिकों को नुकसान से बचाता है। सफलता के लिए नौसेना की ताकत की आवश्यकता है, अगर ईरान विरोध करता है तो वृद्धि का खतरा है।