- डॉ. खुशालचंद बाहेतीरांची - बेपत्ता मुलीचा तपास करताना हलगर्जी केल्याप्रकरणी झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील एका प्रकरणात २८ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ९ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या १८ वर्षीय मुलीचे सांगाडा सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
२१ जुलै २०२५ रोजी चास कॉलेजमध्ये अर्ज देण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून तरुणी बाहेर पडली. मात्र त्यानंतर ती परतली नाही. कुटुंबीयांनी त्याच दिवशी पोलिसांकडे धाव घेतली. परंतु सुरुवातीला पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास टाळाटाळ केली. २४ जुलै २०२५ रोजी मुलगी हरवल्याची माहिती नोंदवली. मात्र एफआयआर ४ ऑगस्टपर्यंत दाखल केला नाही. विलंबामुळे तपासात त्रुटी निर्माण झाल्या. मुलीच्या आईने पोलिसांच्या निष्काळजीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली.
गुन्ह्याची कबुली अन् मुलीचा सांगाडा सापडला तपासादरम्यान २६ वर्षीय आरोपी दिनेश कुमार माहतो याला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली व नंतर पोलिसांनी मुलीचा सांगाडा, कपडे व इतर पुरावे जप्त केले. हायकोर्टात मुलीच्या आईने आरोप केला की, पोलिसांनी सात महिने प्रकरण फिरवत ठेवले आणि योग्य तपास केला नाही.काही अधिकाऱ्यांवर आरोपीकडून लाच घेतल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला. यावर बोकारो पोलिस ठाण्यातील अधिकारी, तपास अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसह २८ जणांना निलंबित केले.
Web Summary : In Bokaro, Jharkhand, 28 police officers were suspended after a missing girl's skeletal remains were discovered following a nine-month delay in the investigation. The family alleges police negligence and bribery, prompting a High Court petition.
Web Summary : बोकारो, झारखंड में, जांच में नौ महीने की देरी के बाद लापता लड़की के कंकाल अवशेष मिलने पर 28 पुलिस अधिकारियों को निलंबित कर दिया गया। परिवार ने पुलिस की लापरवाही और रिश्वतखोरी का आरोप लगाया है, जिसके बाद उच्च न्यायालय में याचिका दायर की गई।