शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
6
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
7
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
8
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
9
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
10
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
11
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
12
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
13
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
14
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
15
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
16
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
17
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
18
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
19
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 07:07 IST

Kalyan Accident News: कल्याण - मुरबाड महामार्गावर उल्हास नदीवर नव्याने बांधलेल्या रायता पुलावर सोमवारी प्रवाशांची वाहतूक करणारी इको टॅक्सी आणि सीमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. त्यात टॅक्सीचालकासह सर्व ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

- राजेश जाधवम्हारळ (कल्याण) - कल्याण - मुरबाड महामार्गावर उल्हास नदीवर नव्याने बांधलेल्या रायता पुलावर सोमवारी प्रवाशांची वाहतूक करणारी इको टॅक्सी आणि सीमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. त्यात टॅक्सीचालकासह सर्व ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. 

अपघात एवढा भीषण होता की टॅक्सीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी यंत्रणेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.  अपघातग्रस्त सहा आसनी टॅक्सीत ११ प्रवासी कोंबले होते. ते अवैध वाहतुकीचे बळी ठरले.

ग्रामस्थांनी तातडीने अपघातग्रस्तांना गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोन्ही चालकांवर गुन्हा दाखल केला असून ट्रकचालक फरार झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अनिल लाड यांनी ‘लोकमत’ला दिली. 

कसा घडला अपघात?सोमवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान कल्याण येथून प्रवाशांना मुरबाडला घेऊन जाणारी इको टॅक्सी आणि मुरबाडमार्गे येणारा सीमेंट काँक्रीट मिक्सर हे रायता येथील उल्हास नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलावर समोरासमोर आले. पुलावरील एका मार्गिकेचे काम सुरू असल्याने एकच मार्गिका सुरू आहे. त्या मार्गिकेवर वेगाने जाणारी टॅक्सी आणि ट्रकची टक्कर झाली.

दोन सख्ख्या बहिणी अन् भावाचा अंतअपघातात दिवा (ठाणे) येथील मोहपे कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणी व भावाचा मृत्यू झाला. ते त्यांच्या काकाच्या मुलाच्या हळदी समारंभासाठी पर्हे गावात जात होते. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला असून आईला कोणाचा आधार राहिला नाही.

मृतांची नावे    टॅक्सी चालक प्रशांत ऊर्फ बबलू  चंदने (२१, देवगाव, मुरबाड), भूषण घोरपडे (४४, अंधेरी),  जिजा केंबारी (५०, टेंभरे, मुरबाड), अनंता पवार (साखरे, मुरबाड), दीपक गवळी (कल्याण), गणपत मधे (३२, देवराळवाडी, मुरबाड), नेहा मोहपे, (२२, दिवा), मानसी मोहपे (२०, दिवा), प्रथमेश मोहपे (१७, दिवा), रिंकू लोधी ( ४०, मध्य प्रदेश), गणेश गुरव (४०, कुर्ला).

English
हिंदी सारांश
Web Title : Illegal Passenger Transport Turns Deadly: 11 Killed in Kalyan-Murbad Accident

Web Summary : A horrific collision between an Eco taxi and a cement mixer truck on the Kalyan-Murbad highway resulted in the immediate deaths of 11 people, including three women. The taxi, overloaded with passengers, was traveling illegally. The truck driver fled the scene; police are investigating.
टॅग्स :kalyanकल्याणAccidentअपघात