शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 06:27 IST

Sonia Gandhi News: काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी सोमवारी महिला आरक्षणाबाबत सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी एका लेखात म्हटले आहे की, प. बंगाल व तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभासाठी सुरू असलेला हा प्रयत्न आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी सोमवारी महिला आरक्षणाबाबत सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी एका लेखात म्हटले आहे की, प. बंगाल व तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभासाठी सुरू असलेला हा प्रयत्न आहे. खरा मुद्दा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा असून, ही नियोजित पुनर्रचना अत्यंत धोकादायक व संविधानावरच हल्ला आहे. 

लोकसभेतील जागांच्या वाढीसंबंधी मतदारसंघांची पुनर्रचना ही राजकीय स्वरूपातच व्हायला हवी. सरकारने २०२३ ला ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ संसदेत मंजूर केला होता; परंतु आगामी जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच हा कायदा लागू करण्याची अट ठेवली. 

आरक्षण लागू करण्याची  खरगे यांची होती मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीपासूनच हे आरक्षण लागू करण्याची आक्रमक मागणी केली होती.मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केले. आता याच  मुद्द्यावर ‘यू-टर्न’ घेत विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी ३० महिने का लागले, असा प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. 

तीन पक्षांनी जारी केले व्हीप महिला आरक्षण व मतदारसंघ पुनर्रचनेबाबत चर्चेसाठी आयोजित संसदेच्या विशेष अधिवेशनाला १६ ते १८ एप्रिलदरम्यान सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहावे यासाठी काँग्रेस, भाजप आणि जदयू या पक्षांनी व्हीप जारी केले आहेत.

ऐतिहासिक निर्णयाच्या उंबरठ्यावर भारत : मोदीपंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी सोमवारी ‘नारी शक्ति वंदन परिषदे’त बोलताना विश्वास व्यक्त केला की, २०२९ पासून महिला आरक्षण लागू करण्यासाठी संसदेत होणारे बदल हा २१ व्या शतकातील सर्वात ऐतिहासिक निर्णय ठरेल. १६ ते १८ एप्रिल दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष सत्रात या कायद्यात आवश्यक दुरुस्त्या केल्या जातील, ज्यामुळे नवीन इतिहास रचला जाईल.सप्टेंबर २०२३ मध्ये पारित झालेल्या या कायद्याची अंमलबजावणी जनगणना व मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे (परिसीमन) लांबणीवर पडली होती. मात्र, आता प्रस्तावित दुरुस्तीनंतर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासूनच महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या बदलामुळे  २७३ जागा महिलांसाठी राखीव असतील, असेही मोदी यावेळी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sonia Gandhi Slams Delimitation as Dangerous Attack on Constitution

Web Summary : Sonia Gandhi questions women's reservation bill intentions, alleging political motives in West Bengal, Tamil Nadu elections. She criticizes planned constituency delimitation as a dangerous assault on the constitution. Modi anticipates a historic decision, paving way for 33% women's reservation by 2029.
टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीWomen Reservationमहिला आरक्षणCentral Governmentकेंद्र सरकार