By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:47 IST
1 / 8Oracle Layoff and New CFO Salary: एकीकडे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जात आहेत आणि दुसरीकडे टॉप मॅनेजमेंटला कोट्यवधींचं पॅकेज मिळत असल्याचं दिसत आहे. हेच चित्र सध्या 'ओरॅकल' (Oracle Corporation) मध्ये पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू असताना कंपनीनं नवीन मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) नियुक्त केला आहे, ज्यामुळे कंपनीच्या प्राधान्यक्रमावर चर्चा सुरू झाली आहे.2 / 8कंपनीनं त्यांच्या सीएफओंना दिलेल्या पॅकेजची सध्या चर्चा सुरू आहे. कंपनीने हिलेरी मॅक्सन (Hilary Maxson) यांची नवीन सीएफओ म्हणून नियुक्ती केली आहे. 3 / 8त्यांचा मूळ पगार वर्षाला सुमारे ९.५ लाख डॉलर आहे. याव्यतिरिक्त, त्यांना २५ लाख डॉलरपर्यंत कामगिरीवर आधारित बोनस आणि सुमारे २६ मिलियन डॉलरचं इक्विटी पॅकेज मिळेल. हिलेरी मॅक्सन यांचं एकूण पॅकेज सुमारे २९.४५ मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात जवळपास २४५ ते २५० कोटी रुपये इतकं आहे.4 / 8ही नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा कंपनीने जागतिक स्तरावर ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. यामध्ये एकट्या भारतातून १२,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. 5 / 8अनेक कर्मचाऱ्यांना अचानक नोटीस देऊन बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय. अशा परिस्थितीत उच्च स्तरावर जाहीर झालेल्या या मोठ्या पॅकेजमुळे कर्मचाऱ्यांमधील नाराजी अधिकच वाढली आहे.6 / 8अनेक कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठं नुकसान त्यांच्या स्टॉक कॉम्पेन्सेशनमध्ये झालं आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे शेअर्स अद्याप 'वेस्ट' (Vest) झाले नव्हते, ते नोकरी गेल्यामुळे रद्द झाले. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना केवळ पगारच नाही, तर भविष्यात मिळणारा मोठा आर्थिक फायदाही गमवावा लागलाय.7 / 8ओरॅकल सध्या एआय (AI) आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर वेगानं लक्ष केंद्रित करत असून त्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहे. आर्थिक नियोजन आणि भांडवल व्यवस्थापन हाताळण्यासाठी मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचं सांगत ही नवी नियुक्ती करण्यात आली आहे. 8 / 8मात्र, हे केवळ एका कंपनीपुरते मर्यादित नसून संपूर्ण टेक उद्योगात असाच कल दिसून येत आहे. जिथे कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरील नोकऱ्यांमध्ये कपात करून एआयसारख्या उच्च कौशल्याच्या क्षेत्रांत गुंतवणूक वाढवली जात आहे.