SRH Praful Hinge’s Fairytale IPL Debut 2026 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. पण पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्याला झिरो ठरवत नागपूरकर प्रफुल पटेल IPL मधील नव्या हिरोच्या रुपात चर्चेत आला. आपल्या पहिल्या षटकात तिघांना शून्यावर धाडताना पदार्पणातील सामन्यात ३ विकेट्स घेण्याचा मोठा डाव या विदर्भकराने साधला. दुसऱ्या षटकात आणखी एक विकेट आपल्या खात्यात जमा करत त्याने आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली. SRH च्या ताफ्यातून पदार्पणात खास छाप सोडण्यासाठी २४ वर्षीय जलदगती गोलंदाजाने फार वेळ घेतला नाही. पण पहिल्या ओव्हरमध्ये हिरो होणाऱ्या विदर्भकाराचा प्रवास सहज आणि सोपा नव्हता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रफुल हिंगेचा इथपर्यंतचा प्रवास
यंदाच्या हंगामातील पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात ईशान किशनने चार चौघांत त्याला गंडवल्यापासून ते सुरुवातीच्या काळात गोलंदाजीच्या शैलीवरुन आक्षेप घेतल्यामुळे बिथरून ट्रॅक बदलण्याचा विचार करण्यापर्यंत अनेक या नव्या सुपर स्टारच्या आयुष्यात घडल्या. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सर्व अडथळे पार करत त्याने IPL मध्ये एन्ट्री मारली. संधी मिळताच आपला सुसाट वेगाची खतरनाक झलक त्याने दाखवून दिली. त्याच्या या प्रवासात कुटुंबियाची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. सामन्यानंतर खुद्द क्रिकेटरनं यासंदर्भातील खुलासा केला. इथं जाणून घेऊयात त्याच्या प्रवासासंदर्भातील खास गोष्ट
गोलंदाजी शैलीवर संश्य, वडिलांमुळे भूमिकेवर राहिला ठाम
वयाच्या १३ व्या वर्षांपासून टेनिस बॉलच्या माध्यमातून क्रिकेटचे धडे घ्यायला सुरुवात केलेल्या प्रफुल हिंगे गोलंदाजाच्या रुपात घडत असताना त्याच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. गोलंदाजी शैली अयोग्य असल्याा ठपका बसल्यावर ट्रॅक बदलून फलंदाजाच्या रुपात करिअर घडवण्याचा विचारही त्याने केला. पण वडिलांनी त्याला गोलंदाजीवर ठाम राहायला सांगितले अन् त्याने सर्व उणीवा भरून काढून आपल्यातील क्षमता सिद्ध करण्याचा ध्यास घेतला. आज त्यानं घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रफुलच्या यशात थोरल्या बहिणीचाही हात
प्रफुल्ल हिंगेच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याच्या थोरल्या बहिणीचेही योगदान आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या त्याच्या बहिणीने सुरुवातीच्या काळात आपला अभ्यास सांभाळत त्याला सरावाच्या सत्रांपर्यंत पोहोचण्यास आणि प्रशिक्षणात सातत्य ठेवण्यास मदत केली. बहिणीला रात्री उशीरापर्यंत अभ्यास करताना पाहयचो. तिच्याकडून प्रेरणा घेत क्रिकेटरच्या रुपात घडण्यासाठी शिस्त्रबद्ध काम केल्याची गोष्ट हिंगे याने मुलाखतीत बोलून दाखवली होती. नागपूरमध्ये लहानाचा मोठा झाला, वयाच्या १३ व्या वर्षांपासून क्रिकेटचे धडे
१८ जानेवारी २००२ मध्ये नागपूरमध्ये जन्मलेला प्रफुलने १३ व्या वर्षी क्रिकेटरच्या रुपात घडण्यासाठी अकादमीत प्रवेश घेतला. क्लब क्रिकेट आणि वेगवेगळ्या वयोगटातील ट्रायल्स देत असताना विदर्भ संघाकडून १६ वर्षांखालील संघात त्याची निवड झाली. १९ वर्षांखालील गटात खेळताना ३६ बळी घेत त्याने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवून दिली. ऑक्टोबर २०२४ मध्ये विदर्भ संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रफुलनं १० सामन्यातील १९ डावात २७ विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ६ सामन्यात त्याच्या खात्यात पाच तर २ टी-२० सामन्यात ४ विकेट्स जमा आहेत. अल्प अनुभवासह SRH कडून फक्त ३० लाख रुपयांत मिळालेल्या संधीच सोन करून दाखवत त्याने यंदाच्या हंगाम गाजवण्याचे संकेत दिले आहेत.
Web Summary : Prafull Hinge overcame bowling action doubts to shine in IPL. Mentored by his father, supported by his sister, the Nagpur native made a remarkable debut for SRH, taking key wickets despite early career hurdles.
Web Summary : प्रफुल्ल हिंगे ने गेंदबाजी एक्शन पर संदेह को दूर कर आईपीएल में शानदार प्रदर्शन किया। पिता द्वारा मार्गदर्शन और बहन द्वारा समर्थन के साथ, नागपुर के इस खिलाड़ी ने एसआरएच के लिए महत्वपूर्ण विकेट लिए और शानदार शुरुआत की।