Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:28 IST

अलविदा माय लव्ह...! जनाईचा आजीला अखेरचा निरोप

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काल सर्वांनी त्यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनाला मनोरंजनविश्वातील आणि राजकारणातील अनेकांनी हजेरी लावली. सर्वांना अश्रू अनावर झाले होते. आशा भोसले यांचं नात जनाई भोसलेशी खूप जवळचं नातं होतं. जनाई कायम आजीची सावली बनून राहायची. त्यांच्या निधनानंतर जनाई भोसले अक्षरश: कोसळून गेली आहे हे सर्वांनी काल पाहिलं. काल रात्री उशिरा जनाई भोसलेने इन्स्टाग्राम स्टोरीवर भावना व्यक्त केल्या आहेत.

'माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं प्रेम हरपलं'

आशाताई आणि जनाई यांच्यात आजी-नातीपेक्षाही एक वेगळं आणि घट्ट नातं होतं. आजीच्या जाण्याने जनाई पूर्णपणे कोलमडली असून तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. "सध्या माझ्या मनात भावनांचा मोठा कल्लोळ सुरू आहे. मला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा मी सविस्तर नक्कीच लिहीन; पण सध्या मला फक्त सर्वांचे आभार मानायचे आहेत. ज्यांनी आजीला मान दिला, आदर दिला आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, त्या सर्वांची मी ऋणी आहे," असे जनाईने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

जनाईने पुढे लिहिले की, "आशा आजी या आदरासाठी आणि सन्मानासाठी खऱ्या अर्थाने पात्र होत्या. मला खात्री आहे की, त्या आपल्या सर्वांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील. आज त्यांच्यावर जो प्रेमाचा वर्षाव झाला, तो त्यांनी नक्कीच वरून पाहिला असेल." 

आजीसोबतचा एक जुना फोटो शेअर करत तिने 'अलविदा माय लव्ह, लव्ह ऑफ माय लाईव्ह' असे लिहीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. अंत्यविधीच्या वेळीही जनाईचे अश्रू थांबत नव्हते, तिची ही अवस्था पाहून उपस्थित चाहत्यांचेही डोळे पाणावले.

जनाई भोसले काय करते?

जनाईने आपल्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिचे 'केहंदी है' हे गाणे गाजले असून स्वतः आशाताईंनी तिचे कौतुक केले होते. गायनासोबतच जनाई आता अभिनयाच्या जगातही पाऊल ठेवणार आहे. 'द प्राइड ऑफ भारत- छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटातून ती पदार्पण करत आहे. आजीने नेहमीच तिला प्रोत्साहन दिले होते, मात्र करिअरच्या या महत्त्वाच्या वळणावर आजीची साथ सुटल्याने जनाईला मोठा धक्का बसला आहे.

याआधी एका मुलाखतीत जनाईने आजीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले होते की, "माझं आजीवर खूप प्रेम आहे. मी त्यांना नेहमी सांगायचे की, तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ नका, नेहमी माझ्यासोबत राहा. मला त्यांना कोणासोबत शेअर करायलाही आवडत नाही." ज्या गोष्टीची भीती जनाईला वाटत होती, तोच कठीण प्रसंग आता तिच्यासमोर उभा ठाकला आहे. सध्या संपूर्ण मनोरंजन विश्व जनाईला या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो, अशी प्रार्थना करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Janai Bhosle Devastated by Grandmother Asha Bhosle's Death; Expresses Grief

Web Summary : Janai Bhosle mourns the loss of her grandmother, Asha Bhosle, expressing profound grief on social media. She fondly remembers their close bond and acknowledges the immense love and respect Asha received. Janai shares a heartfelt tribute, highlighting Asha's lasting impact and legacy.
टॅग्स :आशा भोसलेबॉलिवूडसोशल मीडिया