शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : "संघर्ष करणं हेच माझ्या नशिबात", मंत्रिपद न मिळाल्याने प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेंवर नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:49 IST

Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली.

Maharashtra Politics ( Marathi News ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. मंत्रि‍पदासाठी अनेक नेते इच्छुक होते. शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे मंत्रि‍पदासाठी इच्छुक होते, पण सर्वे यांना मंत्रिपद मिळालेले नाही. यामुळे आता सुर्वे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यांनी माध्यमांसोबत बोलताना नाराजी व्यक्तही केली आहे. 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले, मी एक सामान्य घरातील आहे. आम्ही संघर्ष करुन इथंपर्यंत आलो आहे. मी काम करुन कॉलेज पूर्ण केले आहे. संघर्ष माझ्या पाचवीला पूजला आहे. मंत्रि‍पदासाठी माझा विचार एकनाथ शिंदे यांनी केला असेल पण अनेकजण इच्छुक होते. त्यात काहीजण आजी, माजी आहेत. काही मातब्बरांची मुल आहेत. मी साधा गरीब घरातील आहे, यावरुन माझ्या जीवनात संघर्ष आहे हे निश्चित सिद्ध झाले आहे, असं सांगत आमदार प्रकाश सुर्वे यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. 

मी अडीच महिन्यांसाठी देखील मुख्यमंत्री होऊ शकतो; अजित पवारांचे फडणवीसांसमोरच वक्तव्य, अन् चर्चांना उधाण

"ते मोठे नेते आहेत, त्यांनी विचार करुनच निर्णय घेतला असेल. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो होतो तेव्हा मुंबईतील पहिला आमदार मी होतो. तेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला होता. त्यांनी माझी मोठी बदनामी केली होती. मी आता पुन्हा एकदा चांगल्या मतांनी विजयी झालो आहे, असंही सुर्वे म्हणाले. साहेबांनी मला संधी दिली असती तर मी त्या संधीचं सोनं केलं असतं. लोकसभेलाही आम्ही चांगले लीड घेतले आहे, असंही सुर्वे म्हणाले. 

नाराजीमुळे कोणता मोठा निर्णय घेणार का? या प्रश्नावर बोलताना प्रकाश सुर्वे म्हणाले, शिंदे साहेब ठरवतील तो निर्णय घेऊ. त्यांच्यासोबत होतो आहोत. त्यांनी आता न्याय द्यायचा का ते ठरवायचं आहे, असंही प्रकाश सुर्वे म्हणाले. 

काल शिवसेनेतील ११ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांच्या पक्षाला 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत.

कॅबिनेट मंत्री 

1) शंभुराज देसाई

2) उदय सामंत

3) दादा भुसे

4) गुलाबराव पाटील

5) संजय राठोड

6) संजय शिरसाट

7) प्रताप सरनाईक

8) भरत गोगावले

9) प्रकाश आबिटकर

राज्यमंत्री 

10) आशिष जयस्वाल

11) योगेश कदम

टॅग्स :Prakash surveप्रकाश सुर्वेMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना