शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics:"एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री व्हावेत...",शिवसेना खासदाराने सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:14 IST

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महायुतीने राज्यात २३० जागा जिंकल्या. दरम्यान, आता मुख्यमंत्रिपद कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत.

Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महायुतीने राज्यात २३० जागा जिंकल्या. दरम्यान, आता मुख्यमंत्रिपद कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजपा आहे, भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री हा भाजपाचा होईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पण दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाच्या खासदारांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची वेळ मागितली. यावर आता खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.

एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत खासदार जाधव यांनी मुख्यमंत्रि‍पदावरही भाष्य केले. खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही आधीच सांगितले आहे की, आमचे महायुतीचे तिनही नेते सक्षम आहेत. ते एकत्र बसून निश्चित चांगल्या प्रकारचा निर्णय घेतली. पण सगळ्यांच्या भावना निवडणुकीत सगळ्यांसमोर एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर होता, म्हणून शिवसैनिकांची आणि आमची सुद्धा इच्छा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे, झाले तर आनंद आहे. हा निर्णय महायुतीचे तिनही नेते एकत्र बसून घेणार आहेत.तो जो निर्णय घेतली तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल, असंही खासदार प्रतावराव जाधव म्हणाले. 

"मुख्यमंत्रि‍पदाबाबत अजूनही कोणता फॉर्म्युला ठरलेला नाही, महायुतीचे तिनही नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. मोदी यांनी जिथं सभा घेतल्या, अमित शाह यांनी जिथे सभा घेतल्या तिथं यश आले आहे. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी वेळ मागितली आहे, असंही खासदार जाधव म्हणाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा