राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा; मुंबईत दुहेरी आकडाही गाठता आला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 18:02 IST2026-01-16T18:00:51+5:302026-01-16T18:02:29+5:30

यंदाच्या निवडणुकीत मनसेकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या.

Maharashtra Municipal Election Results 2026: Raj Thackeray's MNS loses in 22 municipalities in the state; Couldn't even reach double figures in Mumbai | राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा; मुंबईत दुहेरी आकडाही गाठता आला नाही

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा; मुंबईत दुहेरी आकडाही गाठता आला नाही

Maharashtra Municipal Election Results 2026: आज महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, बहुतांश ठिकाणी भाजपने बहूमत मिळवले आहे. यात मुंबई मनपाची देशभरात चर्चा सुरू होती. या निवडणुकीच्या निमित्ताने दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यामुळेच, उद्धवसेना आणि मनसे किती जागा जिंकणार, याकडेच सर्व राज्याचे लक्ष लागून होते.

भाजपची मुंबईत ऐतिहासिक झेप

मुंबई मनपात प्रथमच भाजपला बहुमत मिळण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली आहे. मुंबई मनपात उद्धवसेना ६० च्या आसपास जागा जिंकताना दिसत आहे, तर मनसेला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

मनसेचा मोठ्या शहरांत दणदणीत पराभव

आपल्या राजकारणात नेहमी मराठी आणि स्थानिक विरुद्ध बाहेरचे, असा मुद्दा मांडणाऱ्या मनसेला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राज्यातील 22 शहरांत मनसेला एकही जागा मिळालेली नाही. एकूणच पक्ष दहाच्या आकड्यातही पोहोचताना दिसत नाही.

शहरनिहाय मनसेची स्थिती

मुंबई (एकूण 227 जागा): 5

कल्याण-डोंबिवली (122): 4

ठाणे (131): 1

नाशिक (122): 2

नवी मुंबई: 1

अहिल्यानगर: 3

उल्हासनगर: 1

तर पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली-मिरज, मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी, पनवेल, नागपूर, परभणी, जालना, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, मालेगाव, जळगाव, धुळे, इचलकरंजी, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर येथे मनसेचा खातेही उघडलेले नाही. 

 

Web Title : महाराष्ट्र निकाय चुनावों में मनसे का प्रदर्शन निराशाजनक रहा

Web Summary : महाराष्ट्र निकाय चुनावों में भाजपा का दबदबा रहा। मनसे को 22 शहरों में सीटें नहीं मिलीं, और ठाकरे के एकता आह्वान के बावजूद मुंबई जैसे गढ़ों में भी संघर्ष करना पड़ा।

Web Title : MNS Fails to Impress in Maharashtra Municipal Elections 2026

Web Summary : In Maharashtra's municipal elections, BJP dominated. MNS faced setbacks, failing to secure seats in 22 cities and struggling even in strongholds like Mumbai, despite Thackeray's unity call.