शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Chhagan Bhujbal Corona Positive: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 10:25 IST

Chhagan Bhujbal Corona Positive: :छगन भुजबळ यांनी ट्विटरद्वारे आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची दिली माहिती

ठळक मुद्देछगन भुजबळ यांनी ट्विटरद्वारे आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची दिली माहितीयापूर्वी राजेश टोपे आणि जयंत पाटील यांना झाली होती कोरोनाची लागण

नाशिक : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आली असताना मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे आज ही माहिती दिली. गेल्या दोन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचण्या करून घ्यावा असे आवाहनदेखील भुजबळ यांनी केले आहे.पालकमंत्री भुजबळ गेल्या तीन दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर असून त्यांनी अनेक बैठकांना हजेरी लावली होती. तसंच रविवारी देवळाली येथील आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्याला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह हजेरी लावली होती. त्यानंतर साहित्य महामंडळाच्या बैठकीला देखील ते हजर होते. नाशिकमध्ये येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावादेखील त्यांनी घेतला होता. तसेच त्याची माहिती माध्यमांना दिली. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिक ठाले पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. इतकेच नव्हे तर सायंकाळी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नाशिकमध्ये आजपासून रात्रीची संचारबंदी हे जाहीर केली. यामुळे गेल्या दोन दिवसात भुजबळ हे अनेक मान्यवरांच्या आणि नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे संबंधितांनादेखील आता चाचणी करून घ्यावी लागणार आहे. यापूर्वी आरोग्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागणयापूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. आपली प्रकृती उत्तम असून डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली होती.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChagan Bhujbalछगन भुजबळJayant Patilजयंत पाटीलRajesh Topeराजेश टोपेMaharashtraमहाराष्ट्र