शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News LIVE Updates: बदलापूर-दादर लोकलवर अज्ञाताने भिरकावला दगड, महिला प्रवासी जखमी, डोळ्याला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 21:13 IST

Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi, 27 March 2026: अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धात होर्मुझ सामुद्रधुनीचा विषय गंभीर ...

27 Mar, 26 09:12 PM

बदलापूर-दादर लोकलवर अज्ञाताने भिरकावला दगड

७ वाजून १४ मिनिटांची बदलापूरहून दादरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलवर अज्ञाताने दगड भिरकावला. दादर स्टेशनला लोकल पोहचणार त्याआधी महिला डब्याच्या दिशेने हा दगड एका महिला प्रवाशाला लागला. ही महिला प्रवासी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. 

27 Mar, 26 07:11 PM

बारामती शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

बारामती शहर आणि परिसरात आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
 सकाळपासून उन्हाची तीव्रता जास्त होती; मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि काही वेळातच वाऱ्यासह पाऊस सुरू झाला.

27 Mar, 26 06:07 PM

राष्ट्रवादीचे नगरसेवक आझम काझींवर पोलिसांची कारवाई

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार असतानाही मिरजेत वावरत असल्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक आझम काझी यांच्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काझी यांना ताब्यात घेऊन कर्नाटकातील कुडची येथे पाठवले.

27 Mar, 26 05:40 PM

"पर्यटन विभागाच्या निधीतून खरातच्या खासगी संस्थेला दीड कोटीचा निधी दिला"

कॅप्टन अशोक खरात याच्या खासगी संस्थेला दीड कोटी रुपयांचा निधी दिल्याप्रकरणी मंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. पर्यटन विभागाच्या निधीतून हा निधी देण्यात आला असून तो संबंधित मंत्र्याकडून वसूल करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी असं त्यांनी म्हटलं. 

27 Mar, 26 05:19 PM

होर्मुझ सामुद्रधुनीतून अमेरिकन जहाजांना नो एन्ट्री; इराणचा कडक इशारा!

मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती अधिकच चिघळली असून इराणने आता जागतिक सागरी व्यापाराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण अधिक कडक केले आहे. अमेरिका किंवा युरोपला जाणारे एकही जहाज आमच्या परवानगीशिवाय ही सामुद्रधुनी ओलांडू शकणार नाही," असा थेट इशारा इराणने दिला आहे.

27 Mar, 26 05:05 PM

महाराष्ट्रात पुढील २ दिवस वादळी पाऊस

राज्यात पुढील दोन दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान शास्त्रज्ञ  एस. डी. सानप यांनी माध्यमांशी बोलतांना माहिती दिली आहे.

27 Mar, 26 04:41 PM

नांदेड : पेट्रोल-डिझेल खरेदीस अनावश्यक साठा टाळा; दैनंदिन वापरपुरतंच घेण्याचे आवाहन

नांदेड जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर आज नागरिकांनी तिसऱ्या दिवशीही मोठी गर्दी केली. अफवांमुळे काही लोक अनावश्यक साठा करत आहेत, ज्यामुळे इंधनपुरवठ्यात तात्पुरता असमतोल निर्माण होऊ शकतो.
नांदेड जिल्ह्यातील आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दैनंदिन व्यवहारासाठी जेवढे पेट्रोल आणि डिझेल लागते, तेवढंच इंधन खरेदी करा, त्यामुळे सर्वांना इंधन उपलब्ध होईल.

27 Mar, 26 04:26 PM

चांदवडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; गारपीट व वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान

चांदवड तालुक्यात काल दिनांक २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने गारपीट, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली.

27 Mar, 26 03:39 PM

सांगली जिल्ह्याला पावसाचा तडाखा

मिरज आणि पलूस तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने बुधवारी आणि गुरुवारी जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. मिरजच्या पूर्व भागात बुधवारी रात्री वादळामुळे घरांची छते उडाली आणि झाडे कोसळून सुमारे २० वीज खांब पडल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. ईदगाह परिसरात घरावर झाड कोसळल्याची घटना घडली. गुरुवारी पलूस तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्षबागांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.

27 Mar, 26 03:03 PM

बुलढाणा: पेट्रोल पंपावर चक्क पाण्याची 200 लिटरची टाकी घेऊन पोहचला ग्राहक

बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिकठिकाणवरील पंपावर इंधनासाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. तर चिखली येथील एका पंपावर ग्राहकाने चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन पंपावर आला आणि टाकी भरून डीझेल ही घेऊन गेला असल्याचा प्रकार घडला. तर इतर ही ग्राहक पंपावर मिळेल ती प्लास्टिक डब्बे घेऊन रांगेत लागलेले दिसले. दुसरीकडे मात्र काल जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी इंधन साठ्यावर कडक निर्बंध आणले असले तरीही पंप चालकाकडून त्याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. आता प्रशासना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

27 Mar, 26 03:02 PM

नाशिक : वणीमध्ये कलिंगड विक्रीला जोर; उष्णतेमुळे ग्राहकांची वाढती गर्दी

दिंडोरी तालुक्यातील वणी येथे कलिंगडची दुकाने थाटण्यात आली असून ग्राहकांचा कल कलिंगड खरेदीकडे वाढताना दिसत आहे. सूर्यनारायण आता आग ओकत असल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
 

27 Mar, 26 02:56 PM

लॉकडाऊनबाबत अफवा पसरवणाऱ्यांची आता खैर नाही, फडणवीसांचा इशारा

मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना आणि अनेक देशांमध्ये आणीबाणीची स्थिती असताना, भारताने मात्र आपले इंधन व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवले आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून, सध्या सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या लॉकडाऊनच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. 

27 Mar, 26 02:53 PM

झिरवाळ प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ यांनी मला फोन केला होता आणि तो व्हिडीओ अनेक व्हिडीओ जोडून तयार केल्याचे सांगितले. मी त्यांना यासंदर्भात तक्रार करायला सांगितले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

27 Mar, 26 01:52 PM

भोंदू खरातने दिलेला मंदिर पाडण्याचा अजब सल्ला

सिन्नर तालुक्यातील वावी येथील ऐतिहासिक वैजेश्वर मंदिर पाडण्याचा अजब सल्ला देणाऱ्या अशोक खरातचा तो सल्ला ग्रामस्थांनी वेळेत धुडकावून लावत वेळीच शहाणपणा दाखवल्याची भावना आता व्यक्त होत आहे. चार वर्षांपूर्वी घडलेली ही घटना भोंदू खरतच्या अटकेनंतर पुन्हा चर्चेत आली आहे. सिन्नर तालुक्यातील वाती येथे ११३९ सालात उभारण्यात आलेले पुरातन वैजेश्वर मंदिर धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. चार वर्षापूर्वी या मंदिरातील शिवलिंग आता क्षीण झाल्याचे सांगत खरातने मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला ग्रामस्थांना दिला होता. वाचा सविस्तर

27 Mar, 26 01:50 PM

जालना : डिझेल टंचाईमुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

जालन्यातील समृद्धी महामार्गावरील जामवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा संपल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. डिझेल अभावी पंपासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

27 Mar, 26 01:44 PM

केंद्राचा व्यावसायिक एलपीजीबद्दल केंद्राचा मोठा निर्णय, राज्यांना मिळणार जास्त गॅस

केंद्र सरकारने व्यावसायिक वापराच्या एलपीजी वाटपात बदल केला आहे. राज्यांच्या एलपीजी पुरवठ्यात वाढ करण्यात आली आहे. २० टक्के एलपीजी जास्त दिला जाणार असला, तरी हा २० टक्के गॅस पूर्णपणे औद्योगिक वापरासाठी दिला जाणार आहे. स्टील, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल आणि उद्योगांना हा गॅस दिला जाणार आहे. 

27 Mar, 26 01:04 PM

सरकारी कंपनीची ५ लाख इंडक्शनची ऑर्डर

इराण संकट वाढल्यानंतर देशातील एलपीजी (LPG) पुरवठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एका सरकारी कंपनीनं ५ लाख इंडक्शन्सची ऑर्डर दिली आहे. याचसोबत इंडक्शनसाठी उपयुक्त असलेल्या भांड्यांची मागणीही वाढली असून कंपनीनं त्यासाठीही मोठी ऑर्डर देण्याची योजना आखली.

27 Mar, 26 12:01 PM

"इंधन टंचाई रोखण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात"; अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केली सरकारची रणनीती

"पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा परिस्थिती हाताळताना नेहमीच जनतेचा विचार करतात. एलपीजी किंवा इंधनाच्या टंचाईचा फटका सामान्यांना फटका बसू नये, याची काळजी त्यांनी घेतली. ग्राहकांसाठी इंधनाचे दर वाढू नयेत, असे स्पष्ट निर्देश पंतप्रधानांनी दिले होते. देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाची खरेदी थांबवू नये, या उद्देशाने आम्ही उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच, देशात विमानांच्या इंधनाची उपलब्धता पुरेशी राहावी, यासाठी त्याच्या निर्यातीवरील शुल्कात वाढ केली आहे," असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या

27 Mar, 26 11:52 AM

अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द

भोंदूबाबा अशोक खरात याचा पिस्तुल परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. खरातविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल असून त्याचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करीत आहे. तपासादरम्यान ताब्यातील खरातच्या शस्त्रसाठ्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली होती. वाचा सविस्तर

27 Mar, 26 11:46 AM

"देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो"

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पश्चिम बर्धमान येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली. भाजपाची कोणतीही रणनीती आपल्याला लढण्यापासून रोखू शकत नाही, असंही त्या यावेळी म्हणाल्या. वाचा सविस्तर

27 Mar, 26 11:41 AM

सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी तेजी

सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये शुक्रवारी वाढ पाहायला मिळाली. पश्चिम आशियातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे बाजारपेठेत वाढलेली अनिश्चितता लक्षात घेता, गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा बुलियनमध्ये (सोने-चांदी) खरेदी वाढवली आहे.

27 Mar, 26 10:59 AM

लॉकडाऊन लावण्याचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट

केंद्र सरकारने कोविड प्रमाणे लॉकडाऊन लावण्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून देशात कोणताही लॉकडाऊन लावण्याचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

27 Mar, 26 10:47 AM

होर्मुजनंतर बाब अल-मंडेब समुद्रधुनी बंद झाल्यास काय होईल?

मध्यपूर्वेतील तणावाचा वणवा आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेण्याची चिन्हे दिसत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून, इराणने अमेरिकेला थेट 'आर्थिक नाकेबंदी'ची धमकी दिली आहे. जर अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावर पुन्हा हल्ला केला, तर जगाचा महत्त्वाचा व्यापारी मार्ग असलेला 'बाब अल-मंडेब' सामुद्रधुनी पूर्णपणे ब्लॉक करू, असा इशारा इराणने दिला आहे.

वाचा सविस्तर

27 Mar, 26 10:44 AM

पुतिन यांनी रशियन उद्योजकांना केले सावध...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्कोमध्ये उद्योजकांशी संवाद साधताना मध्यपूर्वेतील युद्धावर चिंता व्यक्त केली आहे. "या युद्धाचे परिणाम किती खोलवर होतील, हे सांगणे सध्या कठीण आहे, मात्र काही अंदाजांनुसार याचा जागतिक परिणाम कोविड महामारीसारखाच असेल," असे पुतिन यांनी म्हटले आहे.

वाचा सविस्तर 

टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईNarendra Modiनरेंद्र मोदीAshok Kharatअशोक खरातFuel Crisisइंधन टंचाईPrice Hikeदर वाढNarhari Zirwalनरहरी झिरवाळIPL 2026आयपीएल २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCylinderगॅस सिलेंडर