19 Mar, 26 07:49 PM
भूमीपुत्रांच्या हक्कासाठी रायगडात 'मराठी एकता संघ' सज्ज; माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य पुढाकार
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रायगड जिल्ह्यातील जी. एम. वेदक कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत एका नव्या सामाजिक चळवळीचा पाया रचला आहे. 'मराठी एकता संघ रायगड' या संघटनेची अधिकृत स्थापना करण्यात आली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी ही संघटना कार्य करणार आहे.
19 Mar, 26 06:13 PM
बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट
बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, आंबा-केळी-द्राक्ष बागांचे नुकसान बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.. चिखली तालुक्यासह मेहकर, खामगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.
19 Mar, 26 05:34 PM
पंतप्रधान मोदींनी साधला फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद
पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यात चर्चा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मध्य पूर्वेतील संघर्षात संवाद आणि राजनैतिक संबंधांकडे परतण्याची तातडीची गरज यावर चर्चा केली. या प्रदेशात आणि त्यापलीकडे शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आमचा घनिष्ठ समन्वय पुढेही कायम ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत असं मोदींनी म्हटलं.
19 Mar, 26 05:12 PM
एलपीजीला पर्याय म्हणून केरोसीन, कोळशाच्या वापराला परवानगी
भारत सरकारने घरगुती गॅस आणि पीएनजी ग्राहकांना सर्वोच्च प्राधान्य दिलंय. त्याशिवाय केरोसीन आणि कोळसा यासारखे पर्यायी इंधन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. केरोसीन, कोळशाच्या वापराबाबत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना परवानगी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना पीएनजी कनेक्शन देण्याचा सल्लाही राज्यांना देण्यात आला आहे. सरकारने एक राजपत्र अधिसूचना जारी करून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन, प्रक्रिया, शुद्धीकरण, साठवणूक, वाहतूक, आयात, निर्यात, विपणन आणि वितरण यासंबंधी माहिती गोळा करणे, जतन करणे आणि विश्लेषण करण्यासाठी पीपीएसीला (PPAC) नोडल एजन्सी बनवले आहे अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी दिली. तसेच अफवांकडे दुर्लक्ष करा आणि अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा असं आवाहनही त्यांनी केले.
19 Mar, 26 05:10 PM
अमेरिका-इस्रायलमुळे इराण जगातील इतर देशांची आर्थिक नाडी आवळणार?
अमेरिका इस्रायलसोबतच्या युद्धात इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीला आर्थिक शस्त्र बनवण्याची तयारी केली आहे. युद्धात आपली पकड मजबूत करण्यासाठी इराण त्यांच्या संसदेत असा कायदा आणण्याच्या विचारात आहेत ज्यातून या महत्त्वाच्या सागरी मार्गातून जाणाऱ्या जहाजांना मोठ्या प्रमाणात टॅक्स आणि टोल द्यावा लागेल. जर हे विधेयक पास झाले तर जगात तेल, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूचे दर वाढण्याची शक्यता आहे. अमेरिका-इस्रायलसोबत युद्धात इराणसाठी स्ट्रेट होर्मुझ मोठी शक्ती बनला आहे. याठिकाणी जगभरातील तेल वाहतूक रोखून इराणने ट्रम्प यांच्यावर दबाव वाढवला आहे. (सविस्तर वाचा)
19 Mar, 26 05:07 PM
गुजरातच्या राजकोट येथे पाऊल, सखल भागात साचलं पाणी
गुजरातच्या राजकोट भागात अचानक पावसाची हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ..पावसामुळे अनेक सखल भागात साचले पाणी
19 Mar, 26 04:58 PM
"कंगनाची अवस्था स्मृती इराणींसारखी होईल"
भाजपा खासदार कंगना राणौतने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 'टपोरी' म्हटलं आहे. तिच्या या विधानावर चहुबाजूंनी टीका होत आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी यावरून कंगनावर जोरदार निशाणा साधला. "कंगना राणौत ही स्मृती इराणींची रिक्त जागा भरण्याचा प्रयत्न करत आहे. स्मृती इराणींनाही खूप अहंकार होता, पण 'सास भी कभी बहू' प्रमाणे त्या गायब झाल्या. आज त्यांचा पत्ता नाही. कंगना राणौतची अवस्थाही तशीच होईल, जी स्मृती इराणींची झाली. जशा स्मृती इराणी राजकारणातून गायब झाल्या, तसंच कंगनाचं काय झालं हे कुणालाही कळणार नाही" असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर
19 Mar, 26 03:52 PM
आखाती तणावाचा परिणाम : धुळेतील तीन गावांचा LPG ला ‘रामराम’
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. संभाव्य इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या तीन गावांनी एकत्र येत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
19 Mar, 26 03:32 PM
शेअर बाजारात मोठा भूकंप, सेन्सेक्स २१०० अंकांपेक्षा अधिकनं आपटला
शेअर बाजारामध्ये आज चौफेर घसरण पाहायला मिळत असून गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय. बीएसई (BSE) चा ३० शेअर्सचा निर्देशांक 'सेन्सेक्स' २१६४ अंकांची मोठी डुबकी लगावून ७४,५३९ च्या पातळीवर आला आहे. त्याचप्रमाणे निफ्टी ६७२ अंकांच्या घसरणीसह २३,१०५ वर पोहोचला आहे. निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही २ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली.
19 Mar, 26 02:51 PM
भिवंडीतील कशेळी येथे फर्निचर मार्केटला भीषण आग
भिवंडी: तालुक्यातील कशेळी परिसरातील चामुंडा कॉम्प्लेक्स येथील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या आगीत फर्निचरची सुमारे १० ते १२ दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून यामध्ये शेजारील भंगार गोदामही आगीच्या भक्षस्थानी सापडले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर फर्निचर व साहित्य जळाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
19 Mar, 26 01:53 PM
रत्नागिरीत गुढीपाडव्याचा जल्लोष; भव्य शोभायात्रांनी शहर दणाणलं
हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीत गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी सकाळपासून शोभायात्रा काढण्यात येत असून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची भव्य शोभायात्रा विशेष आकर्षण ठरली. मारुती मंदिर ते राम मंदिर या मार्गावर निघालेल्या या शोभायात्रेत मांगल्याचे प्रतीक असलेल्या गुढ्या घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. सुहासिनींनी पारंपरिक वेशभूषेत नटूनथटून उपस्थिती लावल्याने वातावरण अधिकच मंगलमय झालं.एकूणच कोकणात गुढीपाडव्याचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत असून पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे.
19 Mar, 26 01:22 PM
अशोक खरात प्रकरणी रुपाली पाटलांचे गंभीर आरोप
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. खरात याच्याविरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, आता या प्रकरणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी ५८ व्हिडीओ आहेत. म्हणजेच ५८ महिलांवर अत्याचार झाला आहे का? हे पुरावे चाकणकर नष्ट करतील, असा गंभीर आरोप पाटील ठोंबरे यांनी केला. आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ठोंबरे पाटील यांनी हे आरोप केले.
19 Mar, 26 01:16 PM
राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवास्थानी उभारली गुढी...
19 Mar, 26 12:41 PM
नाशिकमध्ये ACB ची कारवाई; अभियंता आणि कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील वैशाली ठाकरे (कार्यकारी अभियंता) तसेच कर्मचारी अरुण धारणकर (वरिष्ठ सहाय्यक लेखा, वर्ग ३) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक. पाटबंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाचे एकूण १६ लाखांचे बिल काढून देण्यासाठी ७२ हजार रुपयांची लाच मागितली होती. ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
19 Mar, 26 12:26 PM
सूरत हादरलं! भीषण आगीनंतर गॅस सिलिंडरचा स्फोट
गुजरातच्या सूरत शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीला आग लागल्याने आणि सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. या आगीत इमारतीत राहणारे ९ लोक जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं प्रयत्न सुरू आहे. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वाचा सविस्तर
19 Mar, 26 12:07 PM
गिरगावात गुढीपाडवा शोभायात्रेचा उत्साह LIVE
19 Mar, 26 11:55 AM
कल्याणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक; सर्व धर्मीयांचा उत्स्फूर्त सहभाग
हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने कल्याणमध्ये भव्य आणि आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. कल्याण सांस्कृतिक मंच आणि जैन समाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकाराने आयोजित या मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषेत तरुणांनी भगवे फेटे परिधान केले होते, तर महिलांनीही फेटे बांधून गुढी घेऊन बाईकवरून सहभाग घेतला. जैन, गुजराती आणि दक्षिण भारतीय समाजातील महिलांसह नारीशक्तीचा देखील विशेष सहभाग दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेत घोडेस्वारांनी मिरवणुकीचे आकर्षण वाढवले.
19 Mar, 26 11:35 AM
मुंबईत गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला, रस्त्यावर रांगोळ्या, ढोल-ताशांचा गजर
मुंबईत गुढीपाडव्यानिमित्ताने ठिकठिकाणी शोभायात्रा आयोजित केल्या गेल्या आहेत. गिरगावात शोभायात्रांच्या निमित्ताने मोठा उत्साह बघायला मिळत आहे. रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या असून, ढोल-ताशाच्या तालावर लेझीम खेळत, तसेच देखावे सादर करत आहेत.
19 Mar, 26 11:22 AM
गुजरातमध्ये महिलेसह ६ जणांना अटक, २ कोटींच्या बनावट नोटा जप्त
अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत एका महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे दोन कोटी रुपये मूल्य असलेल्या बनावट नोटा सापडल्या. या प्रकरणाचा अधिकचा तपास केला जात असून, पोलिसांनी आरोपी वापरत असलेली कारही जप्त केली आहे, असे सहआयुक्त शरद सिंघल यांनी सांगितले.
19 Mar, 26 10:51 AM
मुंबईच्या बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बची धमकी
बुधवारी महाराष्ट्रातील मुंबईच्या बीकेसी येथील पासपोर्ट कार्यालयात बॉम्बची धमकी मिळाली. ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली होती, ज्यात पासपोर्ट कार्यालय आणि स्वच्छतागृहांमध्ये सायनाइड भरलेले १९ बॉम्ब ठेवल्याचा आणि आज दुपारी १:३० वाजता त्यांचा स्फोट होईल, असा दावा करण्यात आला होता. माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने परिसर रिकामा करून शोध घेतला, परंतु काहीही आढळले नाही, ज्यामुळे अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला. ज्या ईमेलमधून धमकी पाठवण्यात आली होती, त्या ईमेलचा तपशील आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
19 Mar, 26 10:50 AM
भाजपा कार्यालयात राडा!
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील भाजपा कार्यालयात एकच खळबळ उडाली. एका महिलेने एका पदाधिकाऱ्याला चोप दिला. स्वागत समारंभाच्या दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे उपस्थित असलेले कार्यकर्तेही अवाक झाले. बघता बघता कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर
19 Mar, 26 10:21 AM
'अयातुल्लाह अली खामेनेई यांना मारायला नको होतं', केंट यांची ट्रम्प यांच्यावर टीका
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक राहिलेल्या जोसेफ केंट यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे.
जोसेफ केंट यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता बोलताना त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका-इस्रायलच्या ऑपरेशनमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई मारले गेले. हीच ती गोष्ट होती जी आम्ही सगळ्यात शेवटी करायला हवी होती.
जेव्हा तुम्ही त्यांना हटवता किंवा हल्ला करून मारून टाकता. असे केल्याने लोक, सरकार आणि पुढचे सर्वोच्च नेते हे एकजूट होतील. मला वाटते की आमच्याजवळ जी माहिती आहे, त्यानुसार मोजतबा खामेनेई यांच्याबाबतीत तेच होत आहे', असे केंट म्हणाले आहेत.
19 Mar, 26 10:14 AM
गुढीपाडव्यानिमित्त मुंबई, पुण्यासह राज्यात शोभायात्रा, मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षामुळे राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यात ठिकठिकाणी गुढीपाडव्या निमित्ताने शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईतील गिरगाव, डोंबिवली, पुण्यात काढण्यात आलेल्या शोभायात्रामध्ये देखावे सादर करण्यात आले. मराठी कलाकार, राजकीय नेतेही या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले.
19 Mar, 26 09:54 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोभायात्रेत झाले सहभागी, सई ताम्हणकरचीही उपस्थिती
गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये शोभायात्रा काढण्यात आली. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सई ताम्हणकर हे सहभागी झाले.