अमेरिका-इस्रायलमुळे इराण जगातील इतर देशांची आर्थिक नाडी आवळणार?; संसेदत आणणार नवा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 17:01 IST2026-03-19T16:58:14+5:302026-03-19T17:01:22+5:30

अमेरिका इस्रायलसोबत युद्ध संपल्यानंतर होर्मुझसाठी नवीन नियम बनवला जाणार आहे. ज्यातून इराण तेल वाहतुकीच्या मार्गावरील वर्चस्व असणारा देश बनेल.

US-Israel Iran war - Iran is considering a proposal to levy transit fees on vessels passing ​through the Strait of Hormuz | अमेरिका-इस्रायलमुळे इराण जगातील इतर देशांची आर्थिक नाडी आवळणार?; संसेदत आणणार नवा प्रस्ताव

अमेरिका-इस्रायलमुळे इराण जगातील इतर देशांची आर्थिक नाडी आवळणार?; संसेदत आणणार नवा प्रस्ताव

तेहरान - अमेरिका इस्रायलसोबतच्या युद्धात इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीला आर्थिक शस्त्र बनवण्याची तयारी केली आहे. युद्धात आपली पकड मजबूत करण्यासाठी इराण त्यांच्या संसदेत असा कायदा आणण्याच्या विचारात आहेत ज्यातून या महत्त्वाच्या सागरी मार्गातून जाणाऱ्या जहाजांना मोठ्या प्रमाणात टॅक्स आणि टोल द्यावा लागेल. जर हे विधेयक पास झाले तर जगात तेल, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूचे दर वाढण्याची शक्यता आहे. अमेरिका-इस्रायलसोबत युद्धात इराणसाठी स्ट्रेट होर्मुझ मोठी शक्ती बनला आहे. याठिकाणी जगभरातील तेल वाहतूक रोखून इराणने ट्रम्प यांच्यावर दबाव वाढवला आहे.

होर्मुझवर इराणचा प्लॅन काय?

स्ट्रेट होर्मुझवर इराण इतका ताकदवान आहे की याठिकाणी इराणी सैन्याचा सामना करण्यासाठी अमेरिकन नौदलही अयशस्वी ठरले आहे. आता इराण होर्मुझ सामुद्रधुनीला त्याचे आर्थिक शस्त्र बनवणार आहे. स्ट्रेट होर्मुझमधून प्रवास करणाऱ्या जहाजांवर ट्रांजिट फी लावण्याचा प्रस्ताव संसदेत मांडला जाणार आहे. जो देश या मार्गाचा वापर शिपिंग, एनर्जी सप्लाय आणि फूड ट्रान्सपोर्टसाठी करतो त्यांना आता इराणला पैसे द्यावे लागणार आहे. या महत्त्वाच्या ठिकाणाचा वापर करून इराणला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाश्चात्य देशांवर 'उलट निर्बंध' लादले जातील असं इराणमधील सर्वोच्च नेते मोहम्मद मोखबर यांनी स्पष्ट सांगितले आहे.

सागरी टोलचा काय होणार परिणाम?

अमेरिका इस्रायलसोबत युद्ध संपल्यानंतर होर्मुझसाठी नवीन नियम बनवला जाणार आहे. ज्यातून इराण तेल वाहतुकीच्या मार्गावरील वर्चस्व असणारा देश बनेल. होर्मुझ सामुद्रधुनीत जगातील पहिले सर्वात महत्त्वाचे चेकपाँईट बनेल. याच सागरी मार्गातून जगातील २० टक्के तेलाची वाहतूक होते. जागतिक तेल पुरवठ्याचा पाचवा हिस्सा आणि लिक्विफाइड गॅस याच अरुंद जलमार्गाने जातो. भारत आपली ऊर्जा गरज भागवण्यासाठी याच मार्गावर अवलंबून आहे. अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात मोर्चा उघडला आहे. परंतु इराणने या नव्या आर्थिक हल्ल्याने ट्रम्प यांची चिंता वाढवली आहे.

Web Title : अमेरिका-इज़राइल युद्ध के बीच ईरान की होर्मुज जलसंधि योजना से वैश्विक अर्थव्यवस्था खतरे में।

Web Summary : अमेरिका-इज़राइल तनाव के बीच, ईरान होर्मुज जलसंधि से गुजरने वाले जहाजों पर ट्रांजिट शुल्क लगाने पर विचार कर रहा है। इससे वैश्विक तेल, गैस और आवश्यक वस्तुओं की कीमतें काफी बढ़ सकती हैं, जिससे ऊर्जा और व्यापार के लिए इस महत्वपूर्ण जलमार्ग पर निर्भर देशों पर असर पड़ेगा।

Web Title : Iran's Strait of Hormuz plan threatens global economy amid US-Israel conflict.

Web Summary : Amidst US-Israel tensions, Iran considers levying transit fees on ships passing through the Strait of Hormuz. This could significantly raise global oil, gas, and essential goods prices, impacting countries reliant on this crucial waterway for energy and trade.